ETV Bharat / business

रतन टाटा यांच्यावर कसे होणार अंत्यसंस्कार? पारशी समाजाचे अंत्यसंस्कार करण्याचे नियम काय? - HOW WILL RATAN TATA BE CREMATED

Ratan Tata funeral : रतन टाटा यांच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होतील. टाटा पारशी समाजाशी संबंधित असूनही त्यांच्यावर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार होतील.

Ratan Tata
रतन टाटा (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 10, 2024, 1:28 PM IST

मुंबई Ratan Tata funeral : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर वरळी, मुंबई येथे दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा हे पारशी समाजाचे होते, पण तरीही त्यांच्यावर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सुमारे ४५ मिनिटे त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाईल. मात्र, पारशी लोकांच्या चालीरीती आणि परंपरा पूर्णपणे वेगळ्या आहेत. पारशी समाजातील अंत्यसंस्काराच्या प्रथा हिंदू आणि मुस्लिमांपेक्षा वेगळ्या आहेत.

पारशी कसा करतात अंत्यसंस्कार? : पारशी लोक हिंदूं प्रमाणे पार्थिवावर अंत्यसंस्कार करत नाहीत. तसंच त्यांच्या मुस्लिमांसारखी दफन करण्याचीसुद्धा पद्धत नाहीय. त्यांची अंत्यसंस्कार करण्याची पद्धत इतर समाजापेक्षा वेगळी आहे. खरे तर मानवी शरीर ही निसर्गानं दिलेली देणगी आहे, जी मृत्यूनंतर देवाला परत करावी लागते, अशी या समाजाची धारणा आहे. जगभरातील पारशी समुदाय त्याच भावनेनं मृतदेहाचे अंत्यसंस्कार करतात. त्यांच्या अंत्यसंस्कार पद्धतीला टॉवर ऑफ सायलेन्स म्हणतात.

टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे काय? : टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजेच निसर्गाच्या होणारे कुशीत अंत्यसंस्कार होय. पारशी समाजातील लोक आपल्या प्रियजनांचे मृतदेह निसर्गाच्या कुशीत सोडून देतात. हे लोक त्याला 'दख्मा' म्हणतात. ही परंपरा या समाजात शतकानुशतके चालत आली आहे. टॉवर ऑफ सायलेन्समध्ये हा मृतदेह गिधाडे खातात. पण नवीन पिढीतील पारशी लोक अंत्यसंस्काराच्या या प्रथेवर फारसा विश्वास ठेवताना दिसत नाहीय. मात्र, पारशी समाजाने बांधलेल्या विद्युत स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार कसे होणार? : मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार पारशीं पद्धतीनुसार होणार नसून हिंदू रितीरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पार्थिवावर विद्युत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे वाचलंत का :

  1. रतन टाटा यांच्यानंतर कोण होणार वारस?, टाटांनी मागं सोडली हजारो कोटींची संपत्ती
  2. उत्पन्नातील सुमारे ६० टक्के हिस्सा दान ते स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, जाणून घ्या, रतन टाटांचे जीवनकार्य
  3. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर अमेरिकेतील उद्योगजगतामध्येही शोक व्यक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.