ETV Bharat / bharat

मधमाशा केवळ आरोग्यासाठीच नाही तर निसर्गासाठीही आहेत उपयुक्त - World Bee Day 2024 - WORLD BEE DAY 2024

world bee day २०२४ : आज जागतिक मधमाशी दिवस आहे. मधमाशीची विशेषत: लक्षात घेता संयुक्त राष्ट्र महासभेने २०१७ मध्ये जागतिक मधमाशी दिन साजरा करण्याचा ठराव समंत केला व २०१८ मध्ये पहिल्यांदा जागतिक मधमाशी दिवस साजरा करण्यात आला.

world bee day
जागतिक मधमाशी दिवस (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 5:05 PM IST

हैदराबाद world bee day २०२४ : मधमाशी नाव ऐकताच प्रत्येकाला डंख आठवत असेल. घराच्या आजू-बाजूस मोहळ पाहिलं की लहान मुलं पडत सुटतात. परंतु मधमाशी पासून तयार होणाऱ्या मधाचे सर्व दिवाने असतात. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मध असतो. लहापणी खोकला झाल्यास आईने प्रेमाणं चाटवलेल्या मधाची आठवन सर्वाना असेल. याच मधमाशांचा २० मे रोजी दिवस साजरा करण्यात येतो.

कधी झालं ठराव : मधमाशी दिसायला लहान असली तरी ती फार गुणकारी आहे. पर्यावरण संतुलन राखण्याकरिता विशेषत: खाद्यान्न उत्पादन पोषणात तिची महत्वाची भूमिका आहे. मधमाशीची विशेषत: लक्षात घेता संयुक्त राष्ट्र महासभेने २०१७ मध्ये जागतिक मधमाशी दिन साजरा करण्याचा ठराव समंत केला व २०१८ मध्ये पहिल्यांदा जागतिक मधमाशी दिवस साजरा करण्यात आला.

मधमाशी दिनाचा इतिहास : स्लोव्हनिया देशातील अंतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षीका पालन तज्ज्ञाचा २० मे १७३४ रोजी जन्म झाला. त्यांनी सन १७६६ मध्ये जगातील पहिलं मधुमक्षिका पालन केंद्र उभारवलं होतं. १७७१ मध्ये त्यांनी मधुमक्षिकापलनावरील पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाने २० मे २०१८ हा जागतिक मधमाशी दिवस म्हणून घोषित केलं.

यावर्षीची थीम : दरवर्षी जागतिक मधमाशी दिवस वेगवेगळ्या थीमवर आधारीत असतं. "युवांसोबत मधमाशी संलग्न" ही यावर्षीची थीम आहे.

मधमाशीबद्दल विशेष :

मधामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे मधाचं उपयोग तुम्ही प्रथमोपरचार म्हणून करू शकता.

मधात अलेल्या फॅक्टोज आणि ग्लुकोजमुळं पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळं खेळाडू ऊर्जा वाढीसाठी मधाचा वापर करतात.

मधमाशी पालनाची प्रथा 4,500 वर्षे जुनी आहे.

५०० ग्रॅम मध तयार करण्यासाठी मधमाशांना वीस लाख फुलांमधून अमृत गोळा करावं लागतं.

मधमाशा नृत्य करून एकमेकांशी संवाद साधतात.

मधमाशा दिवसरात्र काम करत असतात.

व्यवसायाच्या दृष्टीने : भारतातील हवामान मधुमक्षिका पानलाकरिता चांगलं आहे. त्यामुळं अनेक लोक हा व्यवसाय करतं आहेत. २०२०-२१ मध्ये जवळपास 74413 मेट्रिक टन नैसर्गिक मध निर्यात केलाय. त्याचं मुल्य ₹1221 कोटी (US$164.835 दशलक्ष) होतं.

हेही वाचा...

  1. एड्स वॅक्सीन डे : दरवर्षी जगभरात ६ लाखाहून अधिक एड्स रुग्ण गमावतात जीव - World AIDS Vaccine Day
  2. दिवसभरात किती कप चहा किंवा कॉफी सेवन करावी, 'आयसीएमआर'ने जारी केली माहिती - Health advise
  3. ब्रेकफास्टमध्ये या काही चविष्ट खाद्यपदार्थांनी करा दिवसाची सुरूवात - BREAKFAST PHOTO GALLERY

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.