ETV Bharat / bharat

तालिबानपेक्षाही भयंकर! पंजाबमध्ये महिलेला विवस्त्र करत काढली धिंड, काय आहे संपूर्ण प्रकरण - NAKED PARADE women punjab - NAKED PARADE WOMEN PUNJAB

Naked Parade Women Punjab : पंजाबमधील तरनतारनच्या वल्टोहा शहरात एका मुलानं प्रेमापोटी घरातून पळून जाऊन मुलीशी लग्न केलं. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी घरी पोहोचून मुलाच्या आईला मारहाण करत तिला विवस्त्र केलं आणि व्हिडिओ बनवला.

तालिबानपेक्षाही भयंकर! पंजाबमध्ये महिलेला विवस्त्र करत काढली धींड, काय आहे संपुर्ण प्रकरण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 11:43 AM IST

तरनतारन (पंजाब) Naked Parade Women Punjab : वल्टोहा येथील रहिवासी असलेल्या 55 वर्षीय महिलेवर कथितरित्या तिच्या सुनेच्या पालकांनी हल्ला केला आणि गावातून नग्न धिंड काढल्याची घटना पंजाबमधील तरनतारन भागात समोर आलीय. पीडित महिलेच्या मुलानं गेल्या महिन्यातच मुलीशी लग्न केलं होतं. ही घटना 31 मार्च रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी 3 एप्रिल रोजी आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. वल्टोहाच्या एसएचओ सुनीता बावा यांनी मीडियाला सांगितलं की, या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली आहे.

आरोपींचा शोध सुरु : 31 मार्चच्या रात्री पीडिता घरी असताना आरोपीनं तिच्यावर हल्ला केला. तिच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिचं कपडे फाडत तिची नग्न धींड काढल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. यातील आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकत असल्याचं स्टेशन प्रभारींनी सांगितलंय.

महिलेचे आरोप काय : वल्टोहा शहरातील रहिवासी असलेल्या 55 वर्षीय महिलेनं पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत आरोप केलाय की, तिच्या मुलानं जवळपास एका वर्षापूर्वी शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. 31 मार्च रोजी संध्याकाळी तिच्या तक्रारीवरुन मुलीची आई आणि भावाशिवाय दोन अनोळखी लोक तिच्या घराबाहेर आले आणि आरडाओरडा करु लागले. यानंतर ती घरातून बाहेर आली तेव्हा या लोकांनी तिला केवळ मारहाणच केली नाही तर तिचे कपडेही फाडले आणि तिला पूर्ण नग्न करत धिंड काढली. या दरम्यान काही लोकांनी व्हिडिओ बनवला त्यांनी तो सोशल मीडियावर व्हायरल केला आणि समाजात तिचा अपमान केला.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल : या प्रकरणाची माहिती देताना वल्टोहा पोलीस ठाण्याच्या एसएचओ सुनीता बावा यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास करत असलेले एएसआय परमजीत सिंग यांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

हेही वाचा :

  1. मागासवर्गीय कामगाराचं अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक, मुख्य आरोपीसह 4 फरार - Latur Crime News
  2. पोलिसांना खबर न देताच बालकावर अंत्यसंस्कार, आईच्या संशयावरुन मृतदेह पुन्हा काढले बाहेर, नेमकं प्रकरण काय? - Jalna Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.