मेरठ UP Crime News : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या पतीनं तेथील नागरिकत्व मिळावं म्हणून पत्नीवर मित्रासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. नवऱ्यानं त्याच्या मित्रालाही आपला रुम पार्टनर बनवलं होतं. तो विवाहित महिलेवर पत्नीच्या अदला-बदल करणाऱ्या गटात सामील होण्यासाठी दबाव टाकत होता. यामुळं विवाहित महिला मानसिक व शारीरिक आजारी पडली. अखेर व्यथित होऊन विवाहित महिला मेरठला आली. तिनं पती आणि इतर सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केलीय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सासरच्यांकडून विवाहितेचा छळ : मेरठच्या सिव्हिल लाइन्स भागातील पॉश कॉलनीत एक उच्चशिक्षित डॉक्टर आपल्या कुटुंबासह राहतो. विवाहितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा विवाह 14 जुलै 2019 रोजी दिल्लीतील शास्त्रीनगर येथील तरुणाशी झाला होता. हा तरुण अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथं काम करतो. 18 जुलै रोजी उपनिबंधक कार्यालयात विवाहाची नोंदणीही करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी 40 लाख रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. विवाहित महिला जेव्हा सासरच्या घरी पोहोचली तेव्हा सासरच्यांनी तिच्या आई-वडिलांकडे एक कोटी रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. या रकमेतून त्याला फ्लॅट घ्यायचा होता. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यानं सासरे, सासू, भावजय आणि मेहुणे यांनी विवाहितेचा छळ सुरू केला.
पत्नींच्या अदला-बदली करणाऱ्या गटात समावेश होण्याचा दबाव : सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेनं पतीसोबत अमेरिकेला जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र पतीनं नकार दिला. त्याच्या पालकांच्या आग्रहास्तव, तो 11 मार्च 2020 रोजी पत्नीसह कॅलिफोर्नियाला पोहोचला. तो राहत असलेल्या खोलीत त्यानं त्याच्या एका मित्रालाही ठेवलं होतं. पती भारतीय पोशाखाव्यतिरिक्त इतर कपडे घालण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोपही पत्नीनं आपल्या तक्रारीत केलाय. तसंच पतीनं सांगितलं की त्याचं काही जवळचे मित्र इथं पत्नींची अदला-बदल करतात. त्यालाही तिला या ग्रुपमध्ये ॲड करायचं आहे. विवाहितेनं यात सहभागी होण्यास नकार दिला. 25 मार्च 2020 रोजी पती औषध घेण्यासाठी गेला होता. याच दरम्यान त्यांचा एक मित्र आला. त्यानं अश्लील कृत्य केलं.
सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल : यानंतर पतीनं आपल्या मित्राला जेवणासाठी बोलावलं. पत्नीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. विवाहित महिलेचा आरोप आहे की, पतीनं आपल्या मित्राशी संबंध ठेवल्यास तिला अमेरिकन नागरिकत्व मिळेल, असं सांगितलं. पतीच्या सततच्या छळामुळं विवाहित महिला आजारी पडली. त्यानंतर तिनं पतीला भारतात पाठवण्यास सांगितलं. यानंतर ती मेरठला आली. पीडित महिला तिच्या माहेरच्या घरी आली. तिनं पती आणि इतर सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : याप्ररकरणी एसपी आयुष विक्रम सिंह यांनी सांगितलं की, "अमेरिकेत महिलांना त्यांच्या पतीकडून त्रास दिला जात असल्याचं समोर आलंय. हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रात गेल्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातय. पीडितेचा जबाब नोंदवण्यासोबतच पुरावेही मागवले जात आहेत. जेणेकरुन आरोपी पती आणि सासरच्या मंडळींना अटक करता येईल."
हेही वाचा :