ETV Bharat / bharat

1970 पासून होळीच्या काळात तापमान का वाढते? जाणून घ्या तज्ञांचं मत काय - High Temperature During Holi

High Temperature During Holi : गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतात होळीच्या (Holi In India) वेळी तापमानात अचानक वाढ होते. अमेरिकास्थित क्लायमेट सेंट्रलच्या विश्लेषणात हवामानात होणाऱ्या बदलांबाबत संशोधन करण्यात आलं असून सतत वाढणाऱ्या तापमानाची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेऊया.

why does the temperature increase during holi since 1970 know what experts say
1970 पासून होळीच्या वेळी तापमान का वाढते? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 5:12 PM IST

हैदराबाद High Temperature During Holi : दरवर्षी हिवाळा संपल्यानंतर मार्च महिन्यात लोकांमध्ये होळीनिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. भारतात होळी हा सण वेगवेगळ्या रंगांनी साजरा केला जातो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी होळी सणाच्या काळात तापमानाचा पारा वाढत असल्याचं बघायला मिळतंय. पण असं होण्याचं कारण काय? हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

क्लायमेट कंट्रोलचे संशोधन काय म्हणते : यूएस-स्थित क्लायमेट सेंट्रलच्या नवीन विश्लेषणातून असं दिसून आलंय की, मार्च आणि एप्रिल महिन्यात संपूर्ण भारतातील हवामानात तापमान वाढ होत जाते. 1970 पासूनच्या डेटाचे विश्लेषण करताना, अभ्यासात असा दावा करण्यात आलाय की मार्चमध्ये उत्तर आणि पश्चिम भागात सर्वाधिक उष्णतेचा अनुभव येतो. यामध्ये सर्वात मोठा बदल जम्मू आणि काश्मीरमध्ये (2.8 अंश सेल्सिअस) होतो. तर मिझोरममध्ये 1970 (1.9 अंश सेल्सिअस) नंतरचा सर्वात मोठा फरक नोंदवल्यानं एप्रिलमधील तापमान अधिक एकसमान राहिलंय. होळीच्या अनुषंगानं, मिझोरममध्ये 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला तापमान क्वचितच 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले होते.

या वर्षी 9 राज्यांच्या तापमानात वाढ : महाराष्ट्र, बिहार आणि छत्तीसगड ही तीन राज्य या तापमानापर्यंत पोहोचण्याची 5 टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. तर, या वर्षीच्या हवामानात, 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता 9 राज्यांपर्यंत वाढली आहे. .यामध्ये 3 मुख्य राज्यांसह राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र (14 टक्के) यांचा समावेश आहे. देशभरातील 51 प्रमुख शहरांमधील संभाव्यतेतील तफावत लक्षात घेता, एकूण 37 शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक गरम राहण्याची 1 टक्के शक्यता आहे, आणि 11 शहरांमध्ये 10 टक्के किंवा त्याहून अधिक तापमानाची शक्यता आहे.

40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाच्या संभाव्यतेचा अंदाज : क्लायमेट शिफ्ट इंडेक्स ही दैनंदिन हवेच्या तापमानावर हवामान बदलाचा प्रभाव मोजण्यासाठी क्लायमेट सेंट्रलची प्रणाली, तसंच तापमानातील बदलांचा मागोवा घेण्यासाठी अनेक माहिती गोळा करते. यानुसार 1 एप्रिलच्या पुढील 31 दिवसांच्या कालावधीत सरासरी जागतिक सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा 0.88 अंश सेल्सिअस जास्त आहे. हवामान बदल निर्देशांक प्रणाली, जागतिक तापमानात 1°C बदलाच्या प्रतिसादात स्थानिक तापमान कसं बदलतं याचा अंदाज देखील लावते. हा अंदाज 1950-2020 या कालावधीतील कलवर आधारित आहे.

तज्ञ काय म्हणतात : यासंदर्भात अधिक माहिती देत क्लायमेट सेंट्रलचे सायन्सचे उपाध्यक्ष डॉ. अँड्र्यू पर्शिंग म्हणाले की, "फेब्रुवारीमध्ये दिसून आलेल्या तापमानवाढीचा, मार्चमध्येही अवलंब होण्याची शक्यता आहे", असं ते म्हणाले. तर स्कायमेट वेदरचे हवामानशास्त्र आणि हवामान बदल विभागाचे उपाध्यक्ष महेश पलावत म्हणाले की, "पाऱ्याच्या वाढत्या पातळीमागे हवामान बदल आहे हे नाकारता येणार नाही. खरं तर, आपण असं म्हणू शकतो की तापमानाची पद्धत हळूहळू बदलत आहे. मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा दुर्मिळ होत्या, परंतु वाढत्या ग्लोबल वार्मिंगमुळं उष्णतेच्या लाटा किंवा उच्च तापमानाची शक्यताही वाढली आहे. यंदाही अशीच हवामान परिस्थिती पाहायला मिळणार आहे."

हेही वाचा -

  1. Samsung Holi Sale : सॅमसंगच्या धमाकेदार होळी सेलची घोषणा; 'या' प्रोडक्ट्सवर मिळेल भरघोस सूट
  2. Nick Jonas to play Holi in India : निक जोनस पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालतीबरोबर भारतात साजरी करणार होळी
  3. Protest For Separate Vidarbha : वेगळ्या विदर्भाची मागणी; संतप्त विदर्भवाद्यांनी केली नागपूर कराराची होळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.