हैदराबाद Stop Eating Non Veg For A Month: तंदुरी चिकन आणि मटन बघितलं की अनेकांना खाण्याचं मोह आवरत नाही. काहींचा आठवड्यातून दोनदा तरी मांसाहार ठरलेला असतोच. मांसाहार घेणाऱ्या लोकांसाठी चिकन-मटन सोडणं खून कठीण असतं. परंतु तुम्हाला माहिती आहे काय, महिना भर मांस न खाल्ल्यास काय होईल, याचा कधी विचार केला आहे का? चला तर मग जाणून घेऊया...
अभ्यासातून काय आढळले : 'जर्नल ऑफ हायपर टेन्शन २०१६' मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार संशोधकांना असं आढळून आलय की, महिनाभर मांसाहार न केल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब कमी होऊ शकतो. कॅनडातील सेंट मायकल हॉस्पीटलचे डॉ. डेव्हिड जेनकिन्स यांच्या निदर्शनात दिसून आलं की, अनेक महिने मांस न खाल्ल्यास रक्तातील कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी होऊ शकतो.
वजन कमी करणे सोपे होईल : प्रत्येकाला माहिती आहे की, मांसाहारामध्ये जास्त कॅलरीज असतात. ते खाल्ल्यानं आपल्या शरीरातील चरबी वाढते. तज्ज्ञांच्या मते जास्त प्रमाणात चिकन आणि मटण खाणं हे लोकांचे वजन वाढण्यामागील मुख्य कारण आहे. महिनाभर मांसाहार न केल्यास वजन कमी होण्याची शक्यता असते. कमी कॅलरी फळे, भाज्या आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास वजन सहज कमी करता येऊ शकते, असा तज्ञांचा दावा आहे.
पचन क्रियेत सुधार : महिनाभर मांसाहार टाळल्यास पचनक्रिया सुधारते. ताज्या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असतं. त्यामुळं पचनक्रिया सुरळीत चालते. परिणामी बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही.
खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते : मांसाहारी पदार्थांमध्ये चरबी जास्त असते. जास्त प्रमाणात सेवन केल्यानं रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी बिघडू शकते. मात्र, महिनाभर मांस न खाल्ल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते, असं तज्ञांचं म्हणणं आहे. मांसाहार न केल्यानं रक्तदाब सामान्य राहील, असंही म्हटलं जातं.
जळजळ कमी करते : प्रक्रिया केलेलं मांस बाजारमध्ये विविध प्रकारे उपलब्ध आहे. अशा प्रकारे बनवलेल्या वस्तू खाल्ल्यानं शरीरात सूज आणि जळजळ दीर्घकाळ राहते. यामुळं अनेक आजार होऊ शकतात. असा दावा करण्यात आला आहे की, मांस टाळल्यानं जळजळ होण्याचा धोका कमी होऊ शकतो. जेव्हा तुम्ही मांस खाणं बंद करता तेव्हा, तुम्हाला अशक्त आणि थकल्यासारखं वाटतं कारण मांसाहारामध्ये सर्वाधिक प्रथिने आणि लोह असते. याच्या अभामुळं शरीर थकतो.
स्वभावात बदल - जास्त मांसाहार खाल्ल्यास मानुष्य चिडखोर होण्याची शक्यता असते. मांसाहारमुळं माणसाचं शरीर आणि मन दोन्ही अस्वस्थ होण्याची शक्यता असते.
रोगांना आमंत्रण - मांसाहार जास्त प्रमाणत केल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळं उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, किडनीचे आजार, संधिवात, अल्सर असे अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात.
डब्ल्यूएचओचे मत काय - जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार मांसाहार हे मानवी शरीरासाठी धूम्रपानाइतकेच घातक आहे. 'प्रोसेस्ड' मांसापासून प्राणघातक कॅन्सरचा धोका असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.
टीप : वरील आरोग्यविषयक माहिती आणि सूचना केवळ माहितीसाठी आहेत. आम्ही ही माहिती वैज्ञानिक संशोधन, अभ्यास, वैद्यकीय आणि आरोग्य व्यावसायिक यांच्या सल्ल्यांवर आधारित देत आहोत. परंतु, हे अंमलात आणण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. या लेखातील मतांशी ईटीव्ही भारत सहमत असेलच असे नाही.
हेही वाचा