Wayanad Landslides : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनाने देशच नव्हे तर संपूर्ण जग हादरलं आहे. आतापर्यंत 300 हून अधिक मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. तर 200 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखालून अनेक जिवंत लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आलीय. रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी 187 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
#WATCH | Kerala: Search and rescue operations in landslide-affected areas in Wayanad entered 5th day today. The death toll stands at 308.
— ANI (@ANI) August 3, 2024
Drone visuals from Mundakkai area in Wayanad pic.twitter.com/8gzRyxnnIU
नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रडारचा वापर : बचाव कार्याचा आजचा पाचवा दिवस आहे. बचाव कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम तीव्र करत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रडारचा वापर केला जात आहे. केरळ सरकारने केंद्र सरकारला बचाव कार्यात मदत करण्यासाठी रडार पाठवण्याची विनंती केली होती. ढिगाऱ्याखाली आणि कोसळलेल्या घरांमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी आधुनिक उपकरणे आणि कॅडेव्हर डॉग स्क्वॉडचा वापर केला जात आहे. उत्तरी कमांडचे एक झेव्हर रडार आणि दिल्लीच्या तिरंगा माउंटन रेस्क्यू ऑर्गनायझेशनचे चार रीको रडार शनिवारी हवाई दलाच्या विमानाने वायनाडला नेण्यात आले.
#WATCH | Kerala: Search and rescue operation in Landslide affected areas in Wayanad, continues on the 5th day. pic.twitter.com/3XEEmOSJCr
— ANI (@ANI) August 3, 2024
1,300 हून अधिक बचाव कर्मचाऱ्यांकडून शोध मोहीम : 200 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. शोध आणि बचाव कार्यात विशेष असलेल्या खासगी कंपन्या आणि स्वयंसेवक देखील सामील आहेत. बचाव पथकाचे नेतृत्व भारतीय लष्कर, केरळ पोलीस आणि आपत्कालीन सेवांच्या तुकड्या करत आहेत. 1,300 हून अधिक बचाव कर्मचारी शोध मोहीम राबवत आहेत.
#WATCH | Wayanad landslide | A chopper, carrying Indian Air Force personnel, lands at Chooralmala in Wayanad. It has been kept on standby. #Kerala pic.twitter.com/ZlHS77I9NT
— ANI (@ANI) August 3, 2024
सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी : केरळ सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मृतदेहांचे डीएनए नमुने घेतल्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जावेत. प्रत्येक मृतदेहाला एक ओळख क्रमांक दिला जाईल. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत. ओळख पटवणे शक्य नसल्यास 72 तासांच्या चौकशीनंतर पुढील कारवाईसाठी मृतदेह जिल्हा प्रशासनाकडे सोपवावा लागणार. आतापर्यंत तीन अनोळखी मृतदेहांवर कालपट्टा सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. वायनाड भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर मृतदेह जाळण्यासाठी किंवा पुरण्यासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अंत्यसंस्कार करण्यात केले जात आहेत.
Wayanad landslides: Search operation enters Day 5, death toll at 308
— ANI Digital (@ani_digital) August 3, 2024
Read @ANI Story | https://t.co/94yPyDrseW#WayanadLandslides #Kerala #VeenaGeorge pic.twitter.com/c3PstYyb4z
सहा मुलांची सुटका : केरळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ तासांच्या ऑपरेशननंतर वायनाडमधील दुर्गम आदिवासी वस्तीतून सहा मुलांची सुटका केली. सर्वाधिक नुकसान झालेल्या मुंडक्काई येथील चार जणांच्या कुटुंबाची त्यांच्या घरातून सुटका करण्यात आली. 13 गावांसह 56,800 चौरस किमीचा परिसर 'इको सेन्सेटिव्ह झोन' म्हणून जाहीर करावयाच्या अधिसूचनेचा पाचवा मसुदा केंद्र सरकारने शुक्रवारी जारी केला.
वायनाडमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी : हवामान विभागाने शनिवार आणि रविवारी वायनाडमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 6 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे बचाव कार्यावर परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा
- भारतीय सैन्याला सलाम; जवानांच्या शौर्याचा 'हा' व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील - Indian Army Rescue Operation
- वायनाड भूस्खलन प्रकरण : मृत्यूचा आकडा पोहोचला 308 वर; शोधकार्य सुरूच, आरोग्य मंत्र्यांनी दिली 'ही' माहिती - Wayanad Landslide Rescue
- मुसळधार पावसामुळं उत्तराखंडमध्ये दहा जणांचा मृत्यू; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळं 50 जण बेपत्ता, केदारनाथ यात्रा स्थगित - Cloudbursts in Uttarakhand Himachal