ETV Bharat / bharat

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली; एम्समध्ये केलं दाखल - LK Advani Admitted To AIIMS

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 7:07 AM IST

LK Advani Admitted To AIIMS : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या निगराणीखाली लालकृष्ण अडवाणी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

LK Advani Admitted To AIIMS
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (ETV Bharat)

नवी दिल्ली LK Advani Admitted To AIIMS : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली. त्यांना दिल्लीतील एम्स ( AIIMS ) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

अस्वस्थ वाटल्यानं एम्समध्ये केलं दाखल : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी सायंकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. लालकृष्ण अडवाणी यांच्यावर एम्समधील वरिष्ठ डॉक्टरांच्या निगराणीमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती एम्समधील सूत्रांनी दिली आहे. लालकृष्ण अडवाणी यांचं वय सध्या 96 वर्ष इतकं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिला भारतरत्न पुरस्कार : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 30 मार्चला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सलग तिसऱ्यांदा देशात भाजापानं सरकार स्थापन केल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला.

लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न पुरस्कारानं गौरव : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म कराचीत झाला आहे. मात्र देशाची फाळणी झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी दिल्लीतून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. 1942 लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघात प्रवेश करुन समाजकार्याला सुरुवात केली. त्यानंतर दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये लालकृष्ण अडवणी यांनी अगोदर गृहमंत्री आणि नंतर उपपंतप्रधान म्हणून कार्य केलं आहे. 10 डिसेंबर 2007 ला भाजपानं त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं. मात्र भाजपाचा दारुण पराभव झाल्यानं त्यांची पंतप्रधानपदाची संधी हुकली.

हेही वाचा :

  1. लालकृष्ण अडवाणींनी आधुनिक भारताला आकार देण्यात बजावली महत्त्वाची भूमिका : पंतप्रधान - BHARAT RATNA
  2. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही तासांतच घर सोडलं! जाणून घ्या लालकृष्ण अडवाणींचा 'भारतरत्न' बनण्याचा प्रवास
  3. 'भारतरत्न' लालकृष्ण अडवाणी! भाजपाच्या 'भीष्माचार्यां'ना रथयात्रा पावली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.