Kiss Day 2024 : शतकानुशतके, किस (चुंबन) हे प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे. जे भाषेतील अडथळ्यांना पार करते आणि सहजतेने भावनांना उद्दिपित करते. किस हे स्नेह, प्रेम आणि प्रशंसा यांचं लक्षण आहे. किस काहीही न बोलता बरेच काही सांगू शकतं. तर, हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी विविध प्रकारचे किस आणि त्यांचे अर्थ पाहूयात.
- गालाचा किस : प्रेमात पडल्यावर हवीहवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे किस. किस केल्यानं तुमच्यातले नाते अधिक फुलते. गालावर एक किस आपुलकी प्रकट करते. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत, मित्र असो किंवा आई-वडील आपण गालावर किस देऊन अनेकदा शुभेच्छाही देतो. गालावर किस म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काळजी आणि आपुलकी आहे हे दर्शवते.
- कपाळाचा किस : कपाळ किंवा भालप्रदेशावरील किस आपण 'येथे सुरक्षित आहात' तसंच काळजी आणि संरक्षणाची भावना दर्शवतो. ही कृती आत्मविश्वास आणि प्रशंसा व्यक्त करते. हे सुरक्षिततेची भावना आणि व्यक्ती सुरक्षित असल्याचा मूक संदेश देते. नातेसंबंधातील प्रशंसा आत्मीयता आणि विश्वास विकसित करते. आपल्याला समोरच्याची किती काळजी आहे, ते यातून व्यक्त होते. सन्मान आणि जिव्हाळा व्यक्त करण्यासाठीही बहुतेक जण कपाळावर किस करतात.
- हाताचा किस : हातावर किस म्हणजे प्रेम आणि विश्वासाचे प्रतिक आहे. एखाद्याकडे आपली आवड व्यक्त करण्यासाठी हातांवर किस केलं जातं. बहुतांश लोकं प्रपोज करताना प्रिय व्यक्तीच्या हातावर किस करतात.
- नाकाचा किस : हा सिग्नल आहे, जो तुम्ही तुमच्या प्रियकराला पाठवता किंवा क्रशला पाठवता की, तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करत आहात. हा एक सुंदर किसचा प्रकार आहे, जो आपल्या रोमँटिक जोडीदारासाठी प्रेम, काळजी आणि आराधना व्यक्त करतो. त्यामध्ये लैंगिकता अजिबात नसते.
- नेक किस : हे चुंबन सामान्यत: प्रेमीद्वारे केले जातात, जे एकमेकांबद्दल अत्यंत उत्साही असतात आणि लैंगिक हेतू व्यक्त करतात.
- फ्लाइंग किस : फ्लाइंग किस हा शुभेच्छा किंवा गुड-बाय म्हणताना दिला जातो. फ्लाइंग किसही नात्यांना मजबूत करण्यासाठी मदत करतो.
हेही वाचा-