Valentine Day Gift : दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा केला जातो. असं म्हणतात प्रेम व्यक्त करण्यासाठी निमित्ताची गरज नसते, पण तरी 'व्हॅलेंटाईन्स डे'ची जागा खास असते. 'व्हॅलेंटाईन्स डे'ला जोडपी आपल्या पार्टनरला खास गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. तुम्हालाही तुमची गर्लफ्रेंड, पत्नी, पती किंवा बॉयफ्रेंडला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही या खास सहा भेटवस्तू देऊन त्यांना खुश करू शकता.
- मेकअप किट : मेकअप करायला न आवडणाऱ्या मुली अभावानेच आढळतील. तुमच्या गर्लफ्रेंडसाठी मेकअप किट हा सर्वात उत्तम पर्याय असेल. त्यामुळं मेकअपचे सर्व साहित्य असलेलं एकच 'मेकअप किट' तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे पाहून तुमची गर्लफ्रेंड खूप खुश होईल.
- ऑक्साइड ज्वेलरी : सौंदर्यात भर घालणारी वस्तू म्हणजे ज्वेलरी आहे. ज्वेलरी मुलींना फार आवडते. सध्या ऑक्साईडचे दागिने घालायची एक वेगळी फॅशन आहे. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध असणारी ज्वेलरी आपल्या गर्लफ्रेंडला नक्की भेट द्या.
- वेस्टर्न ड्रेस : तुमची गर्लफ्रेंड वेस्टर्न ड्रेस घालत असेल तर, तिच्यासाठी याहून सुंदर दुसरं कोणतंच गिफ्ट असू शकत नाही. तिच्या सौंदर्यात आणखी भर घालणारा एखादा वेस्टर्न ड्रेस तिला गिफ्ट करा.
- हँड बॅग : आकर्षक रंगांच्या आणि वेगवेगळ्या पॅटर्नच्या बॅग्स म्हणजे फॅशनप्रेमींचा आवडीचा विषय. हँड बॅग मुलींना कितीही घ्या त्या कमी वाटतात. प्रत्येकवेळी त्यांना असं वाटतं की, माझी हँड बॅग जुनी झालीय. थोडक्यात काय, मुलींना हँड बॅग्सची गरज जास्त असते. त्यामुळं हे गिफ्ट देखील योग्य आहे.
- स्मार्ट वॉच : घड्याळ सगळ्यांनाच आवडतात. आजच्या युगात प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे आहेत. परंतु, घड्याळांमध्ये नेहमी नवनवीन मॉडेल, स्पेशल एडिशन येत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पार्टनरला स्मार्टवॉच किंवा नुकतेच लॉंच झालेले घड्याळ भेट देऊ शकता.
- इयरपॉड : आजच्या युगात तरूणाईमध्ये इयरपॉडची प्रचंड क्रेझ आहे. चांगल्या प्रतीचे इअरपॉड 1 हजार रूपयांपासून इयरपॉड बाजारात उपलब्ध आहेत. हे गिफ्ट तुमच्या पार्टनरसाठी अतिशय उपयोगी असेल.
हेही वाचा -