नवी दिल्ली Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 23 जुलैला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यापूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सव्रेक्षण अहवाल मांडण्यापूर्वी संसदेत संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यात मोठ्या असलेल्या अर्थव्यवस्थेच्या देशात भारत हा सगळ्यात वेगानं वाढणारा देश आहे. मागील तीन वर्षात आपण 8 टक्के जीडीपी दरानं विकास करत पुढं जात असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वेळी सदनात त्यांना विरोध करुन बोलू न देण्याचा विरोधकांनी प्रयत्न केल्याचा आरोप केला. मात्र पक्षापेक्षा देश महत्वाचा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
#WATCH | Prime Minister Narendra Modi says, " ...it is a matter of great pride for every citizen that india is the fastest growing country among the countries with large economies. in the last 3 years, we are moving ahead with a continuous growth of 8 per cent..." pic.twitter.com/fGmKCw02CK
— ANI (@ANI) July 22, 2024
भारत हा सगळ्यात मोठा वेगानं वाढणारा देश : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मात्र हे अर्थसंकल्पीय अधिवेशन मोठं वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी सभागृहाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी "भारत हा सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशात सगळ्यात मोठा वेगानं वाढणारा देश आहे. मागील तीन वर्षात आपण 8 टक्के विकास दरानं पुढं जात आहोत," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
#WATCH | Opposition MPs raise NEET exam issue in Lok Sabha
— ANI (@ANI) July 22, 2024
Union Education Minister Dharmendra Pradhan says, " ...no evidence of paper leak has been found in the last 7 years. this (neet) matter is going on before the supreme court. i can say with full responsibility that more… pic.twitter.com/uoWySlfQYP
हा अर्थसंकल्प पुढील 5 वर्षाची दिशा ठरवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आज सकाळीच विरोधकांवर मोठा हल्लाबोल केला. मी देशातील नागरिकांना हमी देत आलो आहे. ती हमी वास्तवात उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हा अर्थसंकल्प अमृतकालसाठी महत्वाचा अर्थसंकल्प आहे. आमचा आजचा अर्थसंकल्प हा आगामी 5 वर्षाची दिशा ठरवणारा आहे. त्यासह विकसित भारताच्या आजच्या स्वप्नाची पायाभरणी करेल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
नीट प्रकरणावरुन विरोधक आक्रमक : देशभर गाजत असलेल्या नीत प्रकरणावरुन विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांकडून नीट प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यात आले. मात्र सरकारकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत उत्तर दिलं. ते म्हणाले, मागील 7 व्रषापासून नीट परीक्षेत कोणताही पेपर लिक झाल्याचा पुरावा अद्यापही आढळला नाही. नीट पेपर लिक प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयाकडं गेलं आहे. मात्र मागील 240 परीक्षा आम्ही यशस्वीपणे राबवल्या, हे मी मोठ्या जबाबदारीनं सांगतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- कांद्याला भाव मागण्याचा अधिकार या देशात नाही का? शरद पवारांचा मोदींना प्रश्न - Sharad Pawar Question About Onion
- पंतप्रधान मोदींचे एक्स सोशल मीडियावर 10 कोटी फॉलोअर्स, राहुल गांधींचे किती आहेत फॉलोअर्स? - PM Narendra Modi X followers
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती स्तराची असते सुरक्षा? कोण करतं संरक्षण? दररोज 'इतके' कोटी सुरक्षेवर होतात खर्च - PM Narendra Modi Security