नवी दिल्ली Budget 2024 : मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तरुणांसाठी पंतप्रधान पॅकेजची घोषणा केली. त्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षण, रोजगार आणि कौशल्यावर भर देण्यात आला आहे. नव्या नोकरदारांनाही निर्मला सीतारमण यांनी आनंदाची बातमी दिली आहे.
उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज : रोजगारनिर्मितीसाठी दोन लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 30 लाख युवकांच्या रोजगारासाठी सरकारनं योजना घोषित केली आहे. 20 लाख युवकांना पुढील पाच वर्षात कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. 1 हजार ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अद्ययावत केल्या जाणार आहेत. देशातील शिक्षणसंस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयांचं शैक्षणिक कर्ज दिलं जाणार असल्याचं सीतारमण यांनी घोषित केलं. शैक्षणिक कर्जासाठी तीन टक्क्यांच्या व्याजासाठी ई व्हाउचर दिले जाणार आहे, असंही त्यांनी सांगितले.
Budget 2024 | On Education loans, FM Sitharaman says," govt to provide financial support for loans up to rs 10 lakhs for higher education in domestic institutions." pic.twitter.com/nH3daipqEW
— ANI (@ANI) July 23, 2024
"युवकांसाठी शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी पाच वर्षांसाठीसाठी 2 लाख कोटी रुपये दिले जाणार आहे. यावर्षी 1.48 लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली. याचा फायदा 4.1 कोटी युवकांना होईल. ईपीएफओमध्ये पहिल्यांदा नोंदणी केलेल्या नव्या नोकरदारांना पहिल्या महिन्याचा पगार सरकार देणार आहे. त्यातून 1 कोटी 10 लाख युवकांना फायदा मिळणार आहे. त्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत," असं निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं.
प्रधानमंत्री का पैकेज: ‘रोजगार से जुड़े प्रोत्साहन’ के तहत तीन योजनाएँ घोषित
— Ministry of Finance (@FinMinIndia) July 23, 2024
🔆योजना ए: पहली बार आने वाले
🔆योजना बी: विनिर्माण क्षेत्र में रोजगार सृजन
🔆योजना सी: नियोक्ताओं को सहायता#Budget2024 #BudgetForViksitBharat pic.twitter.com/fKXCI2Sg63
- कोणाला मिळणार लाभ? : अर्थमंत्री सीतारामन यांनी सुरू केलेल्या या योजनेचा फायदा तरुणांना होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असणं आवश्यक असणार आहे. पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना आणि इपीएफओमध्ये नोंदणी करणार्यांना योजनेचा लाभ मिळेल.
#WATCH | #Budget2024 | Finance Minister Nirmala Sitharaman says, " i am happy to announce the prime minister's package of 5 schemes and initiatives to facilitate employment, skilling and other opportunities for 4.1 crore youth over 5 years with a central outlay of rs 2 lakh… pic.twitter.com/E0ooxhs4fy
— ANI (@ANI) July 23, 2024
- 3 हप्त्यांमध्ये लाभ मिळेल : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पगाराचे 15,000 रुपये थेट तरुणांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होतील. मात्र, तरुणांना ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये मिळणार आहे. ही योजना 'पंतप्रधान पॅकेज' योजनेचा एक भाग आहे.
हेही वाचा
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा? शेतकऱ्यांनी केली 'ही' मागणी - Budget 2024 Expectations
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024; सरकारला पाठिंबा दिल्याचा गिफ्ट; अर्थसंकल्पातून बिहारला मोठं गिफ्ट, रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटींचा निधी - Union Budget 2024
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन रेड टॅबलेट घेऊन संसदेत दाखल, पाहा फोटो - Union budget 2024