ETV Bharat / bharat

दिल्लीत दोन मुलांची हत्या, आईची प्रकृती चिंताजनक, पती फरार - Delhi Crime - DELHI CRIME

Two children killed in Delhi : पूर्व दिल्लीतील पांडव नगरमध्ये एका घरात दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी एक 16 वर्षांचा मुलगा असून दुसरी 8 वर्षांची मुलगी आहे. मुलांची आई दुसऱ्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. घटनेनंतर महिलेचा पती फरार आहे.

Two children killed in Delhi
Two children killed in Delhi
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 10:10 PM IST

अपूर्वा गुप्ता यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली Two children killed in Delhi : दिल्लीतील पांडव नगर भागात दोन मुलांची हत्या झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. हल्लेखोरानं पाल्यांच्या आईवरही जीवघेणा हल्ला केला. आईची प्रकृती देखील गंभीर आहे. तसंच मुलांच्या हत्तेनंतर वडील फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास या घटनेची माहिती मिळालीय. फोन करणाऱ्यानं पोलिसांना सांगितलं की, एका घरात दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. एका मुलाचं वय 16 वर्षे, तर मुलीचं वय 8 वर्षे आहे. तसंच मुलांची आई देखील जखमी अवस्थेत घरात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय.

दोन मुलांची हत्या : डीसीपी अपूर्व गुप्ता यांनी सांगितलं की, 20 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता पांडव नगर पोलीस स्टेशनला पीसीआरमध्ये कॉल आलाय. एका घरात खून झाल्याचं सांगण्यात आलं. हे घर शशी गार्डन परिसरात आहे. घराचे मालक श्यामजी आहेत. घराला बाहेरून कुलूप असल्याचं फोन करणाऱ्यानं पोलिसांना सांगितलं. या माहितीवरून पूर्व दिल्लीच्या पांडव नगरचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. घरात प्रवेश केला असता एका खोलीत दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. मुलांची आई दुसऱ्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

आई रुग्णालयात दाखल : जखमी महिलेला रुग्णालयात नेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच हत्या झालेल्या मुलांचे वडील श्यामजी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी क्राईम टीम तसंच एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण करून तपास सुरू केलाय. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात पाठवले आहेत. सीसीटीव्हीवरून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही हत्या का झाली याचे कारण समजू शकलेलं नाही.

हे वाचलंत का :

  1. लॉरेन्स बिश्नोईची कॅब पोहचली सलमानच्या घरी, कॅब चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात - Salman Khan Firing Case
  2. मध्य पूर्वेत युद्धाचं ढग, हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागली डझनभर क्षेपणास्त्रे - israel iran news
  3. Salman Khan : सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिश्नोईच्या नावे कॅब बुक करणाऱ्या तरुणाला अटक - Salman Khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.