श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांची सोमवारी चकमक उडाली. या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाच्या ताफ्यातील एका श्वानाला वीरमरण आलं. देशाची सेवा करताना श्वान 'फँटम' यानं आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरल्यानंतर त्यांच्या जवळ जात होते. यावेळी सुरक्षा दलाचा श्वान 'फँटम'ला दहशतवाद्यांची गोळी लागल्यानं तो जखमी झाला. यामध्येच त्याला वीरमरण आलं. 'फँटम'च्या धैर्य, निष्ठा आणि समर्पण कधीही विसरता येणार नाही, असं भारतीय सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनं यावेळी सांगितलं.
Op ASAN
— White Knight Corps (@Whiteknight_IA) October 28, 2024
Terrorists fired upon a convoy near #Asan, #Sunderbani Sector, targeting Army vehicles in the morning.
Swift retaliation by own troops ensured foiling of the attempt ensuring no injuries. The area has been cordoned off, and a search operation to neutralize the terrorists…
देशसेवा बजावताना 'फँटम'ला वीरमरण : दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना भारतीय सैन्य दलातील श्वान 'फँटम'ला वीरमरण आलं. याबाबत बोलताना सैन्य दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, "आमच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं होतं. यावेळी जवान दहशतवाद्यांच्या जवळ जात होते. मात्र दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. यावेळी देशाची सेवा बजावताना 'फँटम'नं आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. त्याचं बलिदान कधीही विसरता येणार नाही. या कारवाईत भारतीय सुरक्षा दलानं 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यावेळी भारतीय सैन्य दलानं दहशतवाद्यांकडून मोठं युद्धसामग्री जप्त केली. या कारवाईत सैन्य दल, पोलीस एसओजी आणि निमलष्करी दलांनी संयुक्तपणे सहभाग नोंदवला."
स्पेशल पॅरा फोर्सचा होता फँटम डॉग : जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत फँटमला वीरमरण आलं. फँटम हा स्पेशल पॅरा फोर्समध्ये कार्यरत होता. तो बेल्जियन मालिनॉइस या जातीचा जबरदस्त प्रशिक्षित श्वान होता. त्याचा जन्म 25 मे 2020 ला झाला. त्यानंतर 12 ऑगस्ट 2022 ला तो सैन्य दलात दाखल झाला. याबाबत भारतीय सैन्य दलाच्या व्हाईट नाईट कॉर्प्सनं फँटमच्या शौर्याचं स्मरण केलं. व्हाईट नाईट कॉर्प्सनं याबाबत आपल्या सोशल माध्यमावरुन याबाबत लिहिलं की, "फँटमचं धैर्य, निष्ठा आणि समर्पण कधीही विसरलं जाणार नाही. आम्ही आमच्या खऱ्या नायकाच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम करतो."
दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एआयचा वापर : अखनूर चकमकीबाबत जीओसी 10 इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल समीर श्रीवास्तव यांनी मंगळवारी सांगितलं की, "अखनूरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर केला. या चकमकीत आम्ही सैन्य दलाचा एक श्वान गमावला. श्वानाच्या बलिदानामुळेच अनेकांचे प्राण वाचू शकले."
हेही वाचा :
- किश्तवाड चकमक : भारतीय सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीरमरण, छतरू परिसरात जवानांची दहशतवाद्यांशी चकमक - Kishtwar Encounter Update
- जम्मूच्या डोडामध्ये चकमक; सैन्यदलातील कॅप्टनला वीरमरण, एका दहशतवाद्याचा खात्मा! - Encounter in Jammu Doda
- किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, अनंतनागमध्ये दोन जवान हुतात्मा - Anantnag encounter updates