ETV Bharat / bharat

वक्फ विधेयकावर JPC बैठकीत TMC खासदाराने काचेची बाटली अध्यक्षांवर भिरकावली, एक दिवसाकरता निलंबित - TMC MP KALYAN BANERJEE

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजपाचे अभिजित गंगोपाध्याय यांच्यात वक्फ दुरुस्ती विधेयकावर जेपीसीच्या बैठकीत जोरदार वाद झाला.

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी
टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2024, 4:01 PM IST

नवी दिल्ली : मंगळवारी वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार कल्याण बॅनर्जी यांनी समितीच्या अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्यावर काचेची पाण्याची बाटली फेकल्याने गदारोळ झाला. बैठकीदरम्यान बॅनर्जी आणि भाजपा खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्यात जोरदार वादावादी होऊन ही घटना घडली. यानंतर बॅनर्जी यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलं.

घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी तिथे ठेवलेली काचेची पाण्याची बाटली उचलून टेबलावर फेकली. मात्र त्यात ते स्वतःच जखमी झाले. या घटनेनंतर काही काळ बैठक थांबवण्यात आली.

बैठकीमध्ये टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजपा खासदार गंगोपाध्याय यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. त्यांच्या मोठी शाब्दिक चकमक झाली. बॅनर्जींच्या म्हणण्यानुसार, गंगोपाध्याय यांनी भेटीदरम्यान त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली आणि अपमानास्पद शब्द वापरले. या कथित चिथावणीनंतरही, बॅनर्जी यांनी दावा केला की, समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी हस्तक्षेप केला नाही, त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली.

अध्यक्षांनी कोणतीही कारवाई न केल्यानं संतापलेल्या बॅनर्जी यांनी काचेची बाटली फोडली आणि पाल यांच्या दिशेने फेकली. यादरम्यान, बॅनर्जी स्वतः जखमी झाले. कारण काचेमुळे त्यांचा हात चांगलाच कापला गेला, त्यामुळे रक्त वाहू लागलं. जखमी झाल्यानं बॅनर्जी बैठक सोडून निघून गेले.

अंगठा आणि तर्जनीवर कापले - बॅनर्जी यांच्या अंगठ्याला आणि तर्जनीला दुखापत झाली आहे. त्यांना प्राथमिक उपचार करावे लागले. त्यांच्या बोटाला ४ टाकेही पडले आहेत. त्यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी आणि आपचे खासदार संजय सिंह त्यांना पुन्हा बैठकीच्या खोलीत घेऊन जाताना दिसले. अधिकाऱ्यांनी टीएमसी खासदारांना सूपही दिलं.

भाजपा खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समिती निवृत्त न्यायाधीश आणि वकिलांच्या गटाची मते ऐकत होती, तेव्हा विरोधी सदस्यांनी त्यांना या विधेयकात कोणतं स्वारस्य आहे असा प्रश्न केला. त्यानंतर हा वाद भडकला होता.

हेही वाचा..

  1. वक्फ सुधारणा विधेयकाला प्रखर विरोधाबरोबरच समर्थनाचीही धार, सोशल मीडियावर धुमाकूळ - Waqf Amendment Bill
  2. वक्फ दुरुस्ती विधेयक मुस्लिमविरोधी : खासदार असदुद्दीन ओवेसी यांची केंद्र सरकारवर टीका - Waqf Amendment Bill

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.