ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना जवानाला वीरमरण, जूनमध्ये मुलाच्या वाढदिवासाला येणार होते घरी - Chhindwara Soldier Vicky Martyred

Chhindwara Soldier Vicky Martyred : छिंदवाड्याच्या मातीत जन्मलेल्या विकी पहाडे यांना जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये हवाई दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलंय. विकी 2011 पासून भारतीय हवाई सेवेत कार्यरत होते.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 1:18 PM IST

Updated : May 5, 2024, 1:29 PM IST

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

छिंदवाडा Chhindwara Soldier Vicky Martyred : जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात छिंदवाड्याचा सुपुत्र विकी पहाडे यांनी देशासाठी बलिदान दिलंय. विकी पहाडे यांनी भारतीय हवाई दलात हवालदार पदाची जबाबदारी सांभाळली होती. 4 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हवाई दलाचे पाच जवान जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उधमपूर आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील जवान विकी पहाडे यांना वीरमरण आलं.

तीन बहिणींमध्ये विकी एकुलता एक मुलगा : विकी पहाडे यांचा जन्म 1 सप्टेंबर 1990 रोजी नोनिया करबल, छिंदवाडा येथे झाला. 2011 मध्ये भारतीय हवाई सेवेत हवालदार म्हणून ते भरती झाले. कुटुंबातील तीन बहिणींमधील एकुलता एक भाऊ देशासाठी हुतात्मा झालाय. त्यांचे वडील दिमकचंद पहाडे यांचंही काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्याच्या कुटुंबात त्यांची आई, पत्नी आणि 5 वर्षांचा मुलगा आहे.

पुंछमध्ये दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी (4 मे) संध्याकाळी हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे त्यांना वीरमरण आले. तर चार जवानांवर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर गोळीबार केला होता. सुरणकोटच्या सनई गावात हा हल्ला झाला.

बहिणीच्या डोहाळेजेवणासाठी 15 दिवसांपूर्वी आले होते घरी : हुतात्मा जवान विकी पहाडे 15 दिवसांपूर्वी छिंदवाडा येथील आपल्या बहिणीच्या डोहाळेजेवणासाठी घरी आले होते. इलेक्शन ड्युटीमुळं काही दिवसांनी ते पुन्हा सीमेवर देशसेवेसाठी परतले. आता ते पुन्हा जूनमध्ये त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला घरी येणार होते. मात्र, त्यापूर्वी त्यांना वीरमरम आले.

हेही वाचा -

  1. छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला; 3 जवान हुतात्मा, 10 हून अधिक जखमी
  2. भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगाचा स्फोट, एक अग्निवीर हुतात्मा, दोन जण जखमी
  3. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याच्या गाडीवर हल्ला; 3 जवान हुतात्मा

Last Updated : May 5, 2024, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.