जम्मू-काश्मीर Udhampur Terror Attack : भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तणावाचं वातावरण अद्याप कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांमध्ये आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरू आहे. आज जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) एका निरीक्षक अधिकाऱ्याला वीरमरण आलंय. दुडू परिसरातील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला.
During area domination patrol at Chill,Dudu,exchange of fire took place between terrorists and joint parties of JKP and CRPF. In the encounter, one Inspector of CRPF suffered bullet injuries & has attained martyrdom.Operation continues.@JmuKmrPolice @ZPHQJammu @UHqrs @Amod_India
— District Police Udhampur (@UdhampurPolice) August 19, 2024
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर सुरक्षा दलातील जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दिलीय.