नवी दिल्ली SWATI MALIWAL ASSAULT CASE: आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवार यांच्यावर झालेल्या गैरवर्तणूक प्रकरणी चौकशी करण्याकरिता दिल्ली पोलिसांनी विशेष तपास पथक ( एसआयटी) स्थापन केलं आहे. विभव कुमार यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याच्या एका आठवड्यानंतर हे प्रकरण एसआयटीकडे सोपवण्यात आलं आहे. उत्तर जिल्ह्यातील अतिरिक्त डीसीपी अंजिता चिपियाला यांच्या नेतृत्वात तपास करण्यात येणार आहे.
डीसीपी यांच्यासह तीन इन्स्पेक्टर : डीसीपी अंजिता यांच्यासह तीन इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांचा एसआरटीमध्ये समावेश आहे. यात गुन्हा दाखल असलेल्या पोलिस ठाण्याचे एसएचओही आहेत. दिल्ली पोलिसांनी प्रकरणाचा तपास करण्याकरिता विभव कुमार यांना सायंकाळी 5.45 मिनिटांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेलं आणि प्रकरण घडलेल्या ठिकाणी पुन्हा सीन रिक्रिएट करण्यात आलं.
पाच दिवसाची पोलिस कोठडी : 18 मे रोजी न्यायालयाने विभव कुमारला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. भारतील दंड संहितेच कलम 201( पुरावा नष्ट करणे) देखील त्यांच्याविरुद्धच्या एफआयआरमध्ये जोडण्यात आलं आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर गोळा केले होते. विशेष म्हणजे शनिवारी यासाठी पोलिसांनी परवानगी मागितली होती मात्र, ती मिळाली नव्हती.
आज भाजपाची एजंट झालेय? स्वाती मालीवाल यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॅार्मवर लिहलं की ज्या एफआयआर बद्दल माहिती देण्यात आली. ती 2016 मधील आहे. सीएम आणि एलजींनी मला दोन वेळा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त केलं होतं. हे प्रकरण पूर्णपणे खोटं असून न्यायालयानं दीड वर्षासाठी स्थगिती दिली आहे आणि पैशाचा कोणताही व्यवहार झालं नसल्याचे मान्य केलं आहे. त्यांनी पुढे लिहिलं की त्यांच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत मी विभव कुमार यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करत नाही, 'तोपर्यंत मी लेडी सिंघम होती' आणि आज भाजपची एजंट झालेय?
खरं बोलले म्हणून ट्रोल: X पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, “मी खरं बोलं म्हणून मला ट्रोल केलं जात आहे. पक्षातील प्रत्येकाला फोन करण्यात येत आहे. आणि माझे वैयक्तिक व्हिडिओ असल्यास ते पाठवा असं बोललं जातय. तसचं ते सोशल मिडियावर व्हायरलं करण्यात येणार असं सांगितलं जातय. कारचा नंबर ट्वीट करुन माझ्या नातेवाईकांचं जीव धोक्यात घालतं जात आहे. मी खोटं बोलत नाही हे प्रकरण लांब चालणार अशी पोस्ट त्यांनी केलीय.
काय आहे प्रकरण : आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हल्ला केल्याचा आरोप केलं आहे. विभव हे केजरीवाल यांचे निकटवर्तीय आहेत. सोमवारी स्वाती मालीवाल मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भेटीला आल्या होत्या. त्या ड्रॉईंग रुममध्ये थांबल्या असता विभव कुमार तेथे आले आणि स्वाती याच्याशी गैरवर्तणूक केली असल्याच आरोप विभव यांच्यावर आहे.
हेही वाचा