ETV Bharat / bharat

अयोध्या फक्त एक झलक, मथुरा-काशी बाकी आहे - गोविंद देव गिरी - समान नागरिक कायदा

जयपूर येथे अखिल भारतीय संत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पवनधाम सेवा समिती, श्रीधर्मा फाउंडेशन आणि श्री माहेश्वरी समाजाशी संबंधित अधिकारीही सहभागी झाले होते. या कार्यक्रमात देशभरातील संतांनी सहभाग घेतला.

स्वामी गोविंद गिरी जी महाराज
स्वामी गोविंद गिरी जी महाराज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 10:59 PM IST

स्वामी गोविंद गिरी जी महाराज

जयपूर : रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी जी महाराज म्हणाले की, " अयोध्येत राम मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. अयोध्या ही फक्त एक झलक आहे, मथुरा-काशी आणखी बाकी आहे. पण त्यातून कोणताही वाद होऊ नये. आम्ही मुस्लिम समाजाशी यापूर्वीही बोललो होतो. यामध्येही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण देशाची एक भव्यता आहे. ती मोडीत निघता कामा नये, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दोन्ही ठिकाणी हिंदू मंदिरे अस्तित्वात : देशात समानतेचा अधिकार प्रस्थापित करावा लागेल, गाईचं रक्षण करावं लागेल. समान नागरी संहितेबाबत ते म्हणाले, "देश एक असेल तर कायदाही समान असला पाहिजे. यावेळी आचार्य धर्मेंद्र यांचे सुपुत्र सोमेंद्र यांनी कार्यक्रमाची माहिती देताना सांगितलं की, "अयोध्येत रामलला यांच्या प्रतिमेच्या अभिषेकनंतर आयोजित करण्यात आलेला हा देशातील पहिलाच मोठा कार्यक्रम आहे." या कार्यक्रमात देशातीलच नव्हे तर विदेशातील संतांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, "काशी आणि मथुरा या दोन्ही ठिकाणी हिंदू मंदिरे अस्तित्वात असल्याचा पुरावा सापडला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हिंदूंचा अधिकार आहे."

औरंगजेब एक क्रूर शासक होता : मुघल राजवटीची आठवण करून देणारी स्मारके, रस्ते आणि शहरांच्या नावांबाबत कोणतंही सामान्य धोरण बनवलं जाऊ शकत नाही. याचा ठिकठिकाणी विचार करावा लागेल. औरंगजेबाच्या नावावर रस्ता असेल तर त्यांना ते कसं योग्य असेल. कारण औरंगजेब हा क्रूर शासक होता. तेव्हा हिंदूंना मारणं हा जिहाद होता. कलकत्त्याचे कोलकाता, त्रिवेंद्रमचे तिरुवनंतपुरम, मद्रासचे चेन्नई आणि राज्याचे तामिळनाडू असे नामकरण करण्यात आलं. हा नाव बदल केवळ भाजपा करत नाही अथवा केवळ विहिंपची मागणीही नाही. सीपीएम, काँग्रेस आणि द्रविडीयन पक्षांच्या राजवटीतही लोकांना ही नाव हवी असतील तर ते होणं गरजेचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा :

1 अबुधाबीमध्ये पहिल्या BAPS हिंदू मंदिराचं मोदींनी केलं उद्घाटन

2 BAPS हिंदू मंदिर : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन झालेले युएईमधील मंदिर कसे आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती

3 गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणामुळं वकील झाला बहिरा; उच्च न्यायालयाचे केंद्रासह राज्याच्या सर्व प्राधिकरणांना उत्तर देण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.