नवी दिल्ली Kolkata Doctor Murder Rape Case : कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि खून प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली. मंगळवारी (20 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे.
Kolkata's RG Kar Medical College and Hospital rape-murder case | Supreme Court constitutes a National Task Force which includes Surgeon Vice Admiral RK Sarin; Doctor Nageshwar Reddy, Managing Director Asian Institute of National Gastrology among others. pic.twitter.com/9MZRxmKYjs
— ANI (@ANI) August 20, 2024
टास्क फोर्सची स्थापना : सर्वोच्च न्यायालयानं 'राष्ट्रीय टास्क फोर्स'ची स्थापना केली. यामध्ये सर्जन व्हाइस ॲडमिरल आर के सरीन, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल गॅस्ट्रोलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नागेश्वर रेड्डी यांचा या टास्क फोर्समध्ये समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, 'नॅशनल टास्क फोर्स' सुरक्षितता आणि इतर समस्यांकडे लक्ष देईल. लिंग-आधारित हिंसाचार रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करेल. इंटर्न, निवासी, अनिवासी डॉक्टरांसाठी सुरक्षित कामाची जागा ठरवेल.
पश्चिम बंगाल सरकारला निर्देश : डॉक्टर तरुणी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तपासाच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. तसंच संबंधित रुग्णालयात जमावानं तोडफोड केली होती. या प्रकरणीही स्टेटस रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत.
'एफआयआर' नोंदवण्यावर प्रश्न उपस्थित : 'एफआयआर' नोंदवण्यास झालेल्या विलंबावर सीजेआय डी वाय चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित केलेत. एफआयआर दाखल करण्यास उशीर का झाला? असा सवाल त्यांनी केला. पहाटेच गुन्हा उघडकीस आला आणि एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, असं न्यायालयानं नमूद केलं. तसंच ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ही वस्तुस्थिती नाकारली आणि अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं न्यायालयाला सांगितलं.
आमच्यावर विश्वास ठेवा - सर्वोच्च न्यायालय : सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारलं की, "पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणी संरक्षण का दिले नाही? या प्रकरणाचा तपास अत्यंत नाजूक टप्प्यावर आहे. पोलीस काय करत होते?" त्याचवेळी आमच्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी आंदोलक डॉक्टरांना केलंय. संपूर्ण देशाची आरोग्य यंत्रणा सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे, असंही न्यायालानं म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे खंडपीठानं सांगितलं.
हेही वाचा -
- केंद्रानं घेतली डॉक्टर संघटना संपाची दखल; कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल प्रत्येक दोन तासाला द्या - गृह मंत्रालय - Kolkata Doctor Rape Murder Case
- कोलकाता घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा संप, जिल्ह्यातील आरोग्य सेवा एक दिवस बंद - Doctors strike in Sambhajinagar
- कोलकाता घटनेवरुन हरभजन सिंग संतापला; ममतांना पत्र लिहित केली मोठी मागणी - Kolkata Incident