नवी दिल्ली Heart Surgery On Female Dog : राजधानी दिल्लीतील श्वानाला गेल्या एक वर्षापासून हृदविकाराच्या आजारानं ग्रासलं होतं. यावेळी श्वानावर दिल्लीतील जनावरांच्या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलं. दिल्लीतील खासगी रुग्णालयात ही शस्रक्रिया करण्यात आली आहे. स्मॉल अॅनिमल इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. भानु देव शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. श्वानावर अशा प्रकारची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचा दावा जनावरांच्या डॉक्टरांनी केला आहे. ही मादी श्वान असल्याचंही यावेळी जनावरांच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
सात वर्षाच्या ज्युलियटवर करण्यात आली शस्रक्रिया : दिल्लीतील एका प्राण्यांच्या खासगी रुग्णालयामध्ये हृदय विकारावर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. स्मॉल अॅनिमल इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. भानु देव शर्मा यांच्या मते, "सात वर्षांची बीगल ज्युलिएट गेल्या दोन वर्षांपासून मिट्रल व्हॉल्व्हच्या आजारानं त्रस्त होती. ही समस्या मिट्रल व्हॉल्व्हच्या डीजनरेटिव्ह बदलांमुळे होते. या आजारात हृदयाच्या वरच्या चेंबरमध्ये रक्त प्रवाह परत येतो. नंतर आजार जसजसा वाढत जातो, तसतसं हृदयात द्रव तयार होते. हा हृदयासाठी खूप हानिकारक आहे." डॉक्टरांनी 30 मे रोजी व्हॉल्व्ह क्लॅम्प वापरुन ट्रान्सकॅथेटर एज-टू-एज रिपेअर (TEER) प्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी सांगितलं की, "याला हायब्रिड शस्त्रक्रिया असं म्हणतात. ही सूक्ष्म शस्त्रक्रिया असून त्यामुळे श्वानाच्या जीवाला धोका होऊ शकला असता."
एक वर्षापासून ज्युलिएटवर उपचार : बीगल ज्युलिएट ही सात वर्षीय मादी श्वान मागील एक वर्षापासून हृदयविकाराच्या आजारानं ग्रस्त होती. तिच्यावर तिच्या मालकानं एक वर्षापासून उपचार सुरू केले होते. त्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी डॉ भानू देव शर्मा यांनी सांगितलं की, "ही धडधडणाऱ्या हृदयावरील प्रक्रिया असून ती ओपन हार्ट सर्जरीसारखी नाही. त्यासाठी हृदयाच्या फुफ्फुसाच्या बायपास मशीनची आवश्यकता असते. ज्युलियट हृदयविकारानं ग्रस्त असल्याचं आपल्याला कळालं. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला." अमेरिकेतील कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये दोन वर्षांपूर्वी ही शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. ज्युलियटवर शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसांनी तिची प्रकृती ठीक असल्याचं लक्षात घेऊन तिला सोडण्यात आलं.
हेही वाचा :