ETV Bharat / bharat

सेक्स स्कँडल प्रकरणात एचडी रेवन्नाला एसआयटीनं घेतलं ताब्यात, प्रज्वलविरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस - Prajwal Revanna sex scandal - PRAJWAL REVANNA SEX SCANDAL

Prajwal Revanna sex scandal : शेकडो महिलांच्या सेक्स स्कँडल प्रकरणात अडकलेले माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा जेडीएस नेते एचडी रेवन्ना याला कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीनं ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं नुकताच फेटाळला आहे.

Prajwal Revanna sex scandal
प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल (Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 8:09 PM IST

Prajwal Revanna sex scandal : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेले माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना तसंच नातू प्रज्वल रेवन्ना यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी एसआयटीनं एचडी रेवन्ना तसंच प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्याचवेळी प्रज्वलच्या विरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती सीबीआयला करण्यात आली आहे. एसआयटीनं एचडी रेवन्ना यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यासाठी आज सायंकाळपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

प्रज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी : कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी शनिवारी सांगितलं की, विशेष तपास पथकानं (एसआयटी) होलेनरसीपूरमधील जेडीएस आमदार एचडी रेवन्ना तसंच हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. एसआयटीनं माजी मंत्री एचडी यांना दुसरी नोटीस दिली आहे. त्यांना चौकशीसाठी एसआयटीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

पिता-पुत्राविरुद्ध लैंगिक गुन्हा दाखल : जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे, गेल्या रविवारी हसन जिल्ह्यातील होलेनर्सीपुरा पोलिस ठाण्यात पिता-पुत्र दोघांविरुद्ध लैंगिक छळाचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर रेवन्नाचा विश्वासू सतीश बबन्ना याच्याविरुद्ध म्हैसूरमध्ये गुरुवारी रात्री महिलेच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला लैंगिक शोषणाची बळी असल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बबन्नाला अटक केलीय.

प्रज्वलचं परदेशात पलायन : प्रज्वल रेवन्ना याच्या अटकेबाबत गृहमंत्री जी. परमेश्वरा म्हणाले, 'रेवन्नाला परदेशातून परत यावंच लागेल. आज नाही तर परवा त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल. कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 एप्रिल रोजी प्रज्वल परदेशात पळून गेल्याचा आरोप आहे. त्यांच्या वकिलानं एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी सात दिवसांचा अवधी मागितला असून, तपास पथकानं त्यांना मुदत दिली आहे.

बंदुकीच्या जोरावर महिलावर बलात्कार : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना हासन येथून भाजप-जेडी(एस) युतीचा उमेदवार होता, जिथं 26 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. त्याच्याविरुद्ध दुसरा एफआयआर बुधवारी बेंगळुरूमध्ये सीआयडीनं त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीच्या आधारे दाखल केलाय. रेवन्नानं बंदुकीच्या जोरावर महिलावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. अश्लिल व्हिडीओ बनवून तिला सतत ब्लॅकमेल करून तिचं शारीरिक शोषण करत होता, असं देखील प्रज्वलच्या कार्यकर्त्यांनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

700 महिलांचं महिला आयोगाला पत्र : या प्रकरणी 700 हून अधिक महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून प्रज्वल तसंच एचडी रेवन्ना यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही मोहीम गुगल फॉर्मच्या माध्यमातून चालवण्यात आली. पत्र लिहिणाऱ्या महिलांनी या प्रकरणी महिला आयोगावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऑल इंडिया फेमिनिस्ट अलायन्स, वुमन फॉर डेमोक्रसी तसंच महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांच्या सदस्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

काय असते ब्लू कॉर्नर नोटीस? : इंटरपोलच्या माध्यमातून गुन्हेगाराविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते. ही नोटीस कोणत्याही घटनेशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची ओळख, स्थान किंवा क्रियाकलापांची माहिती गोळा करण्यासाठी जारी केली जाते. यासाठी कोणत्याही देशातील सर्वात मोठी एजन्सी असलेल्या इंटरपोलला विनंती केली जाते. भारतात, स्थानिक तपास यंत्रणांच्या पुढाकारानं, सीबीआय इंटरपोलला ब्लू कॉर्नर किंवा रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती करु शकते.

हे वाचलंत का :

  1. कथित सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवन्नाविरोधात ग्लोबल लुकआउट नोटीस, अटकेची टांगती तलवार कायम - Prajwal Revanna Lookout Notice
  2. कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणात खासदार प्रज्वल रेवन्ना अडचणीत एसआयटी स्थापण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्यांचे आदेश - Prajwal Revanna obscene video case
  3. जेडीएस नेते देवे गौडा यांची नातवाला लोकसभा उमेदवारी देण्याची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.