नवी दिल्ली : लोकगायिका तथा बिहार कोकिळा म्हणून ओळख असलेल्या पद्मभूषण शारदा सिन्हा यांचं मंगळवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. छठ उत्सवातील गाण्यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या पद्मभूषण गायिका शारदा सिन्हा यांचं ऐन छठ पर्वात निधन झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनानं बिहारच्या लोकसंगीताची मोठी हानी झाली आहे. शारदा सिन्हा यांच्या निधन झाल्यानं दिल्लीचे नायब राज्यपाल, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त केला आहे. आज लोक गायिका शारदा सिन्हा यांचं पार्थिव आज दुपारी पाटणा इथं आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा जी के निधन की खबर बहुत दुखद है। उन्होंने अपने संगीत से हमारी सांस्कृतिक धरोहर को संजोने का काम किया।
— Atishi (@AtishiAAP) November 5, 2024
ईश्वर उन्हें अपने श्रीचरणों में स्थान दें। https://t.co/0jgvhX1gne
लोकसंगीतातील अमूल्य रत्न गमावलं : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकगायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाप्रकरणी शोक व्यक्त केला. सोशल माध्यमांवर अरविंद केजरीवाल यांनी, "लोकगायिका शारदा सिन्हा यांच्या निधनानं लोकसंगीतानं एक अमूल्य रत्न गमावलं आहे. त्यांचा गोड आवाज आपल्या सगळ्यांमध्ये सदैव अमर राहील. छठ मैया त्यांच्या पुण्य आत्म्यास त्यांच्या चरणी स्थान आणि या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना धैर्य देवो. शारदा सिन्हा यांच्या गाण्याशिवाय छठचा सण अपूर्ण आहे, ओम शांती," अशा प्रकारे त्यांनी शोक व्यक्त केला.
#WATCH प्रसिद्ध लोक गायिका शारदा सिन्हा के निधन पर बीजेपी सांसद मनोज तिवारी ने कहा, " ये दुखद समाचार है। आज रात 9:20 बजे उन्होंने अंतिम सांस ली है... कल सुबह उनके पार्थिव शरीर को पटना ले जाया जाएगा और वहां पर ही उनका अंतिम संस्कार होगा।" pic.twitter.com/9MQjBTHTOj
— ANI_HindiNews (@AHindinews) November 5, 2024
राज्यपाल व्ही के सक्सेना आणि मुख्यमंत्री आतिशींनी केला शोक व्यक्त : दिल्लीचे राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी बिहारच्या लोकगायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाप्रकरणी शोक व्यक्त केला. राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी आपल्या सोशल माध्यमावर लिहिलं की, "बिहारच्या लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं संगीताची मोठी हानी झाली. शारदा सिन्हा यांना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली." दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही शारदा सिन्हा यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या सोशल माध्यमांवरुन त्यांनी लिहिलं, की "प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाची बातमी खूप दुःखद आहे. त्यांनी आपल्या संगीतातून सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम केलं. ईश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान देवो."
#WATCH दिल्ली: मशहूर लोक गायिका शारदा सिन्हा के निधन पर उनके बेटे अंशुमान सिन्हा ने कहा, " परिजनों के लिए तो ये दुख की घड़ी है लेकिन वह मां सबकी थीं। वह सबके करीब थीं जितना दुख मुझे हो रहा है उतना सबको हो रहा होगा...छठ पूजा के समय हमें वह छोड़कर चली गईं... वह हमेशा लोगों के दिलों… pic.twitter.com/cnGe1wsgjv
— ANI_HindiNews (@AHindinews) November 5, 2024
#WATCH | Delhi: Noted folk singer, Sharda Sinha passed away at AIIMS Delhi where she was admitted for treatment.
— ANI (@ANI) November 5, 2024
BJP MP Manoj Tiwari reached AIIMS hospital
(Video Source: Manoj Tiwari office) pic.twitter.com/YchisBjBrH
हेही वाचा :