ETV Bharat / bharat

काँग्रेसमधील अंतर्गत वाद दिल्ली दरबारी; तर संविधान बचाव आंदोलनामुळे मिळालं महाविकास आघाडीला यश; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती - Nana Patole On Lok Sabha Win - NANA PATOLE ON LOK SABHA WIN

Nana Patole On Lok Sabha Win : महाविकास आघाडीला संविधान बचाव अभियानामुळे महाराष्ट्रात मोठं यश मिळाल्याची माहिती नाना पटोले यांनी मंगळवारी दिल्लीत दिली. महाराष्ट्रात मिळालेला विजय आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी त्यांची बैठक झाली. मात्र या बैठकीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पक्ष संघटनेत बदल करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र दिलं.

Nana Patole On Lok Sabha Win
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 10:25 AM IST

नवी दिल्ली Nana Patole On Lok Sabha Win : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विजय मिळवून त्या खासदार झाल्या आहेत. त्यांच्या विजयामुळे पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस संघटनेत बदल करण्याचं पत्र काँग्रेसच्या शिष्टमंडळानं दिल्लीती पक्षश्रेष्ठींकडं दिलं. त्यामुळे मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. तर दुसरीकडं "राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुरु केलेल्या संविधान बचाव अभियानामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला," अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

संविधान बचाव आंदोलनामुळे लोकसभेत यश : "लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरभरुन यश मिळालं आहे. मात्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या संविधान बचाव आंदोलनामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळालं. महाराष्ट्रातील जनतेनं संविधान बचाव आंदोलनाला मोठा पाठींबा देत काँग्रेसवर विश्वास दाखवला," असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील विजय आणि आगामी निवडणुकांबाबत दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत काँग्रेस नेत्यांची मंगळवारी बैठक झाली. त्यावेळी नाना पटोले यांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली.

आगामी निवडणुकीच्या रणनीतीची चर्चा : महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची मंगळवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस केसी वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम आदी महत्वाचे नेते उपस्थित होते. नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पक्ष्याध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत या आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर काँग्रेस नेत्यांनी चर्चा केली. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत असून काँग्रेसनं आतापासून तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानं आता काँग्रेस आगामी निवडणुका आणि बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद दिल्ली दरबारी : महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भरघोस यश मिलालं. मात्र आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातील संघटनेत बदल करण्याची मागणी या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडं केली. "वर्षा गायकवाड यांनी लोकसभेवर यश मिळवल्यानं मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडं केली आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना एकत्रितपणे पत्र लिहिलं आहे. आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकीत पक्ष संघटनेत बदल करणं गरजेचं आहे. सध्याचे मुंबई प्रादेशिक काँग्रेस समितीचे (MRCC) नेतृत्व मुंबईतील नेत्यांना विश्वासात घेत नाही. MRCC च्या नियमित कार्यक्रमांबद्दल देखील अपडेट केलं जात नाही. समन्वयाचा अभाव आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत खूप हानिकारक ठरु शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी मुंबईत विजय मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे संघटनेत फेरबदल करावा," असं या पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्यानं वृत्तसंस्थेला दिली.

हेही वाचा :

  1. "नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार"; अटल सेतू कामाच्या दर्जावरुन नाना पटोलेंची टीका, सेतूची केली पाहणी - Nana Patole on Atal Setu
  2. 'माझे पाय दिवसाढवळ्या कार्यकर्त्यानं धुतले, पण राज्य सरकारमध्ये...'; त्या प्रकरणावर काय म्हणाले नाना पटोले? - Nana Patole
  3. एकीकडं भाजपा आक्रमक तर दुसरीकडं नाना पटोलेंच्या फोटोला दुग्धाभिषेक, वाद चिघळण्याची शक्यता - BJP Vs Congress

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.