नवी दिल्ली Delhi Liquor Policy Case : दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयानं ( ED ) अटक केली आहे. अरविंद केजरीवाल सध्या तिहार कारागृहात बंदिस्त आहेत. त्यांनी नियमित जामीन मिळण्यासाठी दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे.
यापूर्वी फेटाळला अरविंद केजरीवाल यांचा जामीन अर्ज : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन मिळण्यासाठी न्यायालयात 5 जूनला याचिका दाखल केली होती. मात्र ईडीनं अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला न्यायालयात मोठा विरोध केला. सुनावणीत अरविंद केजरीवाल यांचे वकील एन हरिहरन यांनी सांगितलंस की आम्हाला काही वेळापूर्वी ईडीच्या उत्तराची प्रत मिळाली. आमचा ईडीच्या या पद्धतीला विरोध आहे. ईडीच्या या पद्धतीवर न्यायालयानंही आक्षेप घेतला, असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर एएसजी एस व्ही राजू यांनी केजरीवाल यांच्याशिवाय आमच्याकडं इतरही अनेक प्रकरणं आहेत. त्याचा आम्हाला तपास करावा लागणार आहे. त्यानंतर एन हरिहरन यांनी उन्हाळ्याच्या सुटीतच या प्रकरणाची सुनावणी घेण्याची मागणी केल्याचं स्पष्ट केलं.
आरोग्याची काळजी घेण्याचे न्यायालयानं दिले निर्देश : न्यायालयानं केजरीवाल यांचा सात दिवसांचा अंतरिम जामीन अर्ज यापूर्वी 5 जून रोजी फेटाळला होता. न्यायालयानं तिहार तुरुंग प्रशासनाला अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्यासंबंधी आवश्यक चाचण्या करण्याचे निर्देश दिले. निकालाच्या घोषणेदरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या वकिलानं त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. तेव्हा न्यायालयानं, "जेव्हा तुम्हाला आरोग्याची समस्या असेल, तेव्हा तुम्ही न्यायालयात येऊ शकता," असं स्पष्ट केलं.
नियमित जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याची परवानगी : अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं ईडीला 30 मे रोजी नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांचा सात दिवसांचा अंतरिम जामीन अर्ज स्वीकारण्यास 29 मे रोजी नकार दिला. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देण्याचा निर्णय आधीच राखून ठेवण्यात आला. त्यामुळे अंतरिम जामीन वाढवण्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेचा मुख्य याचिकेशी संबंध नाही. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना नियमित जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याची परवानगीही दिली. 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला. अरविंद केजरीवाल यांना 2 जूनला आत्मसमर्पण करण्याचे आदेश न्यायालयानं दिले. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी 2 जून रोजी आत्मसमर्पण केलं असून तेव्हापासून ते तिहार कारागृहात आहेत.
हेही वाचा :
- "देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जातोय"; 21 दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं तिहार कारागृहात आत्मसमर्पण - CM Arvind kejriwal surrendering
- आम्हाला अटक कराल, आमच्या विचारांना कशी करणार अटक ? अरविंद केजरीवालांचा पोलिसांना सवाल - KEJRIWAL PROTEST BJP HEADQUARTER
- स्वाती मालीवाल प्रकरणात अरविंद केजरीवाल आणखी अडचणीत येणार? दिल्ली पोलिसांकडून आई-वडिलांची चौकशी होणार - Swati Maliwal row