जयपूर (राजस्थान) Robot Giga Wedding : लग्न म्हटलं की नवरी, नवरदेव, वऱहाडी मंडळी आलीच. ठराविक वयात मुला-मुलींची लग्न लावून दिली जातात. प्रेमाला वय, रंग, जात, धर्म नसतो असंही म्हणतात. त्यामुळं प्रेम कोणावरही आणि कधीही करू शकतो. पण, लग्नाच्या बाबतीत तसं नाही. दोन सजीव व्यक्तींमध्ये लग्न होत आल्याचं आपण पाहिलं आहे. किंबहुना भारतात तरी अशीच परंपरा आहे. मात्र, एक व्यक्ती चक्क रोबोटसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.
रोबोटसोबत करणार लग्न : राजस्थानचा राहणारे इंजिनियर सूर्य प्रकाश समोटा एका रोबोटशी लग्न करणार आहेत. सूर्य प्रकाश समोटा हे राजस्थानमधील जयपूर येथील रहिवासी आहेत. रोबोट्सची आवड असलेल्या सूर्य प्रकाश आता रोबोटच्या प्रेमात पडले असून, ते आता रोबोटसोबतच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. 'गीगा' या नावाच्या रोबोटसोबत ते लग्न करणार आहेत.
रोबोट तयार करायला किती खर्च? : 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सूर्य प्रकाश यांनी सांगितलं की, "'गीगा' हा रोबोट तयार करण्यासाठी सुमारे 19 लाख रुपये खर्च आलाय. अशा प्रकारचं लग्न करण्यास कुटुंबियांचा नकार होता. पण, आता त्यांना मी तयार केलं आहे. या रोबोटची निर्मिती तामिळनाडूमध्ये केली जात आहे, तर त्याचे प्रोग्रामिंग दिल्लीत केले जात आहे." सूर्य प्रकाश पुढं सांगतात की, "लहानपणापासून मला रोबोट्समध्ये खूप रस होता. मात्र, मी सैन्यात भरती व्हावं असं माझ्या कुटुंबियांना वाटत होतं. त्यानंतर मी सैन्यात भरती होण्याची तयारी केली आणि नौदलातही निवड झाली."
रोबोटसोबत करणार सर्व विधी : सर्वकाही असतानासुद्धा सूर्य प्रकाश यांचं मन रोबोटमध्ये गुंतलं होतं. नंतर कुटुंबानं त्याची रोबोट्सची आवड पाहून आयटी क्षेत्रात जाण्याची परवानगी दिली. यानंतर सूर्य प्रकाश यांनी अजमेरच्या शासकीय महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते रोबोटिक्समध्ये रुजू झाले. या काळात त्यांनी अनेक प्रकल्पांवर काम केलं. 'गीगा'बाबत सूर्य प्रकाश सांगतात की, "मी 'गीगा'सोबत सर्व विधी, परंपरेनुसार लग्न करणार आहे. कुटुंबातील सदस्यही त्यात सहभागी होणार आहेत."
रोबोट कोणती कामं करणार? : सूर्य प्रकाश यांनी सांगितलं की, "जेव्हा हा सर्व प्रकार मी आपल्या पालकांना सांगितला तेव्हा त्यांना धक्काच बसला, पण नंतर घरच्यांना समजावलं. 'गीगा'च्या संपूर्ण प्रोग्रामिंगसाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च येणार असून, हा प्रोग्रामिंग इंग्रजीमध्ये असेल. जेव्हा पाहिजे तेव्हा हिंदी प्रोग्रामिंग देखील जोडलं जाऊ शकतं. तसेच, 'गीगा' आठ तास काम करू शकते, ज्यामध्ये पाणी आणणे, हॅलो म्हणणे, पाहुण्यांचे स्वागत करणे यासारखी कामं तो रोबोट करणार आहे."
विविध रोबोट केले तयार : सुमारे चारशे रोबोटिक्स प्रकल्पांवर काम केल्याचं सूर्य प्रकाश यांनी सांगितलं. कोरोनाच्या काळात जयपूरच्या सवाईमान सिंह रुग्णालयात रोबोटच्या माध्यमातून रुग्णांना औषधे आणि अन्न दिलं जात होतं. हा रोबोही सूर्य प्रकाश यांनी तयार केलाय. याशिवाय त्यांनी कोरोनाच्या काळात टचलेस मतदान यंत्राचं मॉडेलही तयार केलं होतं. आता सूर्य प्रकाश हे इस्रायली सैन्यासोबत काम करणार आहेत आणि लवकरच ते इस्रायलला रवाना होणार आहेत.
हेही वाचा -
- Robot Elephant : तुम्ही कधी रोबोटीक हत्ती पाहिला का? भारतात पहिल्यांदा धार्मिक विधी करण्यासाठी रोबोटीक हत्तीचा वापर
- Google lays off robots : अल्फाबेट टाळेबंदीमुळे ट्रॅश-सॉर्टिंग रोबोट्सवर परिणाम; 100 रोबोट कामगारांना कामावरून काढले
- Student Invents Robot Like Alexa : अकरावीच्या विद्यार्थ्याने बनवला अलेक्सासारखा रोबोट, पाहा व्हिडिओ