बिलासपूर (छत्तीसगड) Rare Medical Case : छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात SIMS मध्ये एक अनोखी घटना समोर आलीय. इथं 26 वर्षीय तरुणामध्ये पुरुष आणि महिलांचे लैंगिक अवयव आढळून आले आहेत. या तरुणामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचेही प्रायव्हेट पार्ट आहेत. या प्रकारच्या आजाराला वैद्यकशास्त्रात 'पर्सिस्टेंट म्यूलेरियन डक्ट सिंड्रोम' ( Persistent Mullerian Duct) म्हणतात. या विकारात स्त्री आणि पुरुष दोघांचेही प्रायव्हेट पार्ट एकाच शरीरात अतात.
पोटात दुखू लागल्यानं रुग्णालयात गेल्यावर आजाराचे निदान: पोटदुखीची तक्रार केल्यानंतर तो तरुण 'सिम्स'मध्ये उपचारासाठी गेला होता, असं सांगण्यात येतंय. उपचारादरम्यान त्याच्या शरीरात दोन प्रायव्हेट पार्ट असल्याचं समोर आलं. तपासणीअंती त्याला कर्करोग झाल्याचं निदान झालं. त्यामुळं डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन कर्करोगाची लागण झालेला भाग स्वच्छ केला. आता तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र महिलेचे प्रायव्हेट पार्ट अजूनही त्याच्या आत आहेत. ते प्रायव्हेट पार्ट शरीरातून काढता येत नाहीत.
तरुणाच्या पोटातून गर्भाशय निष्क्रीय करण्यात आलं : 'ईटीव्ही भारत'नं याबाबत 'सिम्स' मेडिकल कॉलेजच्या कॅन्सर विभागाचे एचओडी डॉ. चंद्रहास ध्रुव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, "तो तरुण 8 महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे उपचारासाठी आला होता. या तरुणाला तीन-चार महिन्यांपासून सतत ताप आणि पोटदुखीचा त्रास होत होता. त्याच्या शरीरात अनेक ठिकाणी अंडाणू होते. त्या तरुणावर उपचार करताना शरीराच्या विविध भागांची तपासणी करण्यात आली. त्या तरुणाच्या पोटात महिलेचं गर्भाशयही असल्याचं आढळून आलं. त्यामध्ये अंडी तयार होत होती. ही अंडी शरीरात राहिल्यास कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर डॉक्टरांनी तरुणावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याला केमोथेरपी दिली. केमोथेरपीच्या माध्यमातून डॉक्टरांच्या लक्षात आलं की तरुणाच्या आत नवीन अंडी तयार होणं थांबलं आहे. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरुणावर शस्त्रक्रिया केल्यानंतर गर्भाशयात नवीन अंडी तयार झाली. अंडाशयातील कॅन्सर काढून टाकण्यात आला. मात्र त्या तरुणाच्या पोटात गर्भाशय अजूनही आहे. त्या तरुणाच्या पोटातून गर्भाशय बाहेर आलेलं नाही."
"जेव्हा मूल गर्भाशयात राहतं तेव्हा अशा प्रकारची समस्या उद्भवते. त्याच्या जननेंद्रियांच्या निर्मितीची प्रक्रिया पहिल्या महिन्यापासून सातव्या महिन्याच्या दरम्यान होते. पुरुष आणि स्त्री बनण्याची प्रक्रिया दोन वेगवेगळ्या नळ्यांमधून घडते. जर स्त्रीसाठीच्या नळ्या तयार होऊ लागल्या तर मुलगी जन्माला येते. पुरुषांच्या नळ्या तयार होऊ लागल्यावर मुलगा जन्माला येतो. मात्र या तरुणासोबत काही वेगळेच घडलंय. जेव्हा तो गर्भात होता तेव्हा त्याच्या दोन्ही जननेंद्रियाच्या नळ्या एकाचवेळी विकसित झाल्या असाव्यात. याच कारणास्तव, त्यात पुरुष आणि स्त्रीचे दोन्ही लैंगिक अवयव तयार झाले आहेत." - डॉ.चंद्रहास ध्रुव, कर्करोग तज्ज्ञ
देशातील चौथे प्रकरण : डॉ. चंद्रहास ध्रुव यांच्या मते, या प्रकारची शरीररचना अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी दिल्लीतून असं प्रकरण समोर आलं होतं. असे रुग्ण देशातील वेल्लोर, तिसरा दक्षिणेकडील राज्यात आणि चौथा बिलासपूर येथे आढळले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा रुग्णांना नेहमी डॉक्टरांच्या संपर्कात राहावं लागतं. तसंच वेळोवेळी चाचण्या कराव्या लागतात.
हेही वाचा :