ETV Bharat / bharat

रामोजी ग्रुपने आंध्र-तेलंगाणातील पूरग्रस्तांसाठी दिली 5 कोटी रुपयांची भरघोस मदत, लोकांनाही केलं मदतीचं आवाहन - Ramoji Group donates Rs 5 crore

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2024, 10:20 PM IST

Ramoji Group donates Rs.5 crore to flood victims - रामोजी ग्रुपने आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयांची भरघोस मदत जाहीर केली आहे. समूहाने व्यक्ती आणि संस्थांना मानवतावादी प्रयत्नात हातभार लावण्याचंही आवाहनही केलं आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

हैदराबाद Ramoji Group donates Rs.5 crore to flood victims : आंध्रप्रदेश तसंच तेलंगाणामध्ये पावसानं धुमाकूळ घातला. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. तर अनेकांचे पुरात बळी गेलेत. त्यामुळे मदतीची मोठी गरज आहे. या परिस्थितीत आपुलकीच्या भावनेनं, रामोजी समूह, ईनाडू रिलीफ फंडच्या माध्यमातून, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तेलुगू राज्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी पाऊस आणि पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी 5 कोटी रुपयांची भरघोस मदत जाहीर केली आहे.

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणामध्ये अलीकडच्या काळात अचानक आलेल्या पुराने मोठ्या प्रमाणावर विनाश घडवून आणला आहे. अनेकांची घरे, उदरनिर्वाहाची साधनं नष्ट झाली आहेत आणि आमच्या हजारो सहकारी नागरिकांच्या सुरक्षेचा पायाच मोडून पडला आहे. निसर्गाच्या शक्तीमुळे संपूर्ण समुदाय बुडाला आहे. कुटुंबे विस्थापित झाली आहेत आणि जीवन उद्ध्वस्त झालं आहे. या त्रासदायक काळात, पूरग्रस्त मदतीसाठी साद देत असताना, एक समुदाय म्हणून एकत्र येणे आणि गरजूंना आपला पाठिंबा देणे हे आपलं कर्तव्य आहे.

अशा या परिस्थितीत ईनाडू रिलीफ फंड तत्काळ बचाव कार्य आणि बाधित लोकांच्या दीर्घकालीन पुनर्वसनासाठी समर्पित आहे. आम्ही हे निश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत की, सर्वात गंभीरपणे प्रभावित क्षेत्रांपर्यंत मदत पोहोचेल, केवळ आधारच नाही, तर अगदी अंधारातही आशेचा किरण दिसेल. या मानवतावादी प्रयत्नात प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेनं आमच्यासोबत हातभार लावावा असं आम्ही कळकळीचं आवाहन करतो. ईनाडू रिलीफ फंडामध्ये तुमचे उदार योगदान घरांची पुनर्बांधणी करण्यात आणि ज्यांनी सर्वस्व गमावले आहे त्यांच्यासाठी पुन्हा आशा जागृत करण्यात मूर्त बदल घडवून आणू शकतात.

मदत खालील बँक खात्यावर पाठविले जाऊ शकते:

ईनाडू रिलीफ फंड

युनियन बँक ऑफ इंडिया

सैफाबाद शाखा

SB A/c क्र. 370602010006658

IFSC कोड: UBIN0537063

या संकटाच्या क्षणी आपण संघटित होऊ या, जे दुःख भोगत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहूया आणि त्यांना सन्मानाने आणि आशेने त्यांचे जीवन पुन्हा उभारण्यास मदत करूया.

रामोजी ग्रुपसाठी,

चि. किरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.