ETV Bharat / bharat

भाजपासह तृणमूलकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर, वाचा कोणते दिग्गज असणार निवडणुकीच्या रिंगणात? - rajya sabha election 2024

Rajya Sabha candidates List : भाजपासह तृणमूल काँग्रेसनंदेखील राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वाचा कोणाला मिळाली उमेदवारी?

Rajya Sabha candidates List
Rajya Sabha candidates List
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 9:20 PM IST

Updated : Feb 11, 2024, 10:47 PM IST

नवी दिल्ली Rajya Sabha candidates List : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून (भाजपा) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं विविध राज्यांमध्ये भाजपाकडून होणाऱ्या आगामी राज्यसभेसाठी उमेदवारांच्या नावाला मान्यता दिली आहे.

'यांना' उमेदवारी जाहीर : बिहारमधून धरमशीला गुप्ता, छत्तीसगडमधून डॉ. भीम सिंह, राजा देवेंद्र प्रताप सिंह, हरियाणातून सुभाष बराला, नारायण कृष्णा भंडगे यांना कर्नाटकमधून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधून डॉ. सुधांशू त्रिवेदी, आरपीएन सिंग, चौधरी तेजवीर सिंग, साधना सिंग, अमरपाल मौर्य, डॉ संगीत बलवंत, नवीन जैन, उत्तराखंडमधून महेंद्र भट्ट, पश्चिम बंगालमधून सौमिक भट्टाचार्य यांना आगामी राज्यसभेसाठी भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

तृणमूल काँग्रेसचे 'हे' आहेत उमेदवार : राज्यसभेवर टीएमसी तृणमूल काँग्रेसनंदेखील राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तृणमूल काँग्रेस चार उमेदवारांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा सुष्मिता देव यांना राज्यसभेवर पाठवणार आहे. याशिवाय पत्रकार सागरिका घोष, ममता बाला ठाकूर, खासदार नदीमुल हक यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. याबाबतची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसनं आपल्या अधिकृत एक्स मीडिया अकाउंटवर याबाबत पोस्ट केली आहे.

पत्रकार सागरिका घोष यांचा प्रवास : सागरिका घोष यांनी विविध नामांकित वृत्तवाहिन्यांसोबत काम केलं. सागरिका घोष अनेक वर्षांपासून भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये महत्वाची भूमीका निभावत आहेत. घोष यांनी मीडिया क्षेत्रातील 30 वर्षांहून अधिक काळ काम केलं. सागरिका घोष यांनी आपलं शिक्षण सेंट स्टीफन्स कॉलेज, नवी दिल्ली येथे पूर्ण केलं. त्यांनी मुद्रित आणि टीव्ही अशा दोन्ही माध्यमांमध्ये पत्रकारिता केली.

हे वाचलंत का :

  1. निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सीएएची आठवण, नेहमीप्रमाणे हाही ‘चुनावी जुमलाच’ - रमेश चेन्नीथला
  2. मुख्यमंत्र्यांबद्दल पोटशूळ असणं हे आता जनतेलासुद्धा कळायला लागलयं- उदय सामंत यांचा संजय राऊतांना टोला
  3. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतरत्नचे वाटप, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

Last Updated : Feb 11, 2024, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.