ETV Bharat / bharat

राहुल गांधी भारतीय की विदेशी नागरिक ? लखनौ उच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडं विचारणा - Rahul Gandhi Citizenship - RAHUL GANDHI CITIZENSHIP

Rahul Gandhi Citizenship Petition : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात बुधवारी (25 सप्टेंबर) सुनावणी झाली.

Rahul Gandhi is british or not, high court seeks reply from central government
राहुल गांधी दुहेरी नागरिकत्व याचिका (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 1:56 PM IST

लखनौ Rahul Gandhi Citizenship Petition : रायबरेलीचे खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल करण्यात आली. या जनहित याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. उच्च न्यायालयानं नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याकडं केलेल्या तक्रारीवर केलेल्या कारवाईचा तपशील मागविलाय. कर्नाटक भाजपा कार्यकर्ता एस विघ्नेश शिशिर यांच्या याचिकेवर न्यायालयानं हा आदेश दिलाय.

सुनावणीदरम्यान काय घडलं? : सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजन रॉय आणि न्यायमूर्ती ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठानं सांगितलं की, आम्हाला सर्वप्रथम भारत सरकारचा निर्णय जाणून घ्यायचाय. त्यांनी तक्रारीवर काय कारवाई केली? हे जाणून घेण्यास आम्ही इच्छुक आहोत. अतिरिक्त सॉलिसिटर (ASG) सूर्यभान पांडे यांना या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे.

न्यायालयानं फेटाळली होती याचिका : गेल्या जुलै महिन्यात याच याचिकाकर्त्याची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. तेव्हा याचिकाकर्त्याची इच्छा असेल तर तो नागरिकत्व कायद्यांतर्गत सक्षम अधिकाऱ्याकडं तक्रार करू शकतो, असं न्यायालयानं म्हटलं होतं. याचिकाकर्ते एस विघ्नेश शिशिर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडं रायबरेलीचे खासदार राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळं ते निवडणूक लढण्यास अपात्र आहेत. अशा परिस्थितीत त्यांची निवडणूक रद्द झाली पाहिजे, असं याचिकेत म्हटलंय. शिशिर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सक्षम अधिकाऱ्याकडं दोनदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्यानं पुन्हा याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान शिशिर स्वतःहून उच्च न्यायालयात हजर झाले. तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी शिशिर यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. राहुल गांधींच्‍या जिभेला चटके देण्‍याच्‍या वक्‍तव्‍यावरून काँग्रेस आक्रमक; अमरावती पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल - Anil Bonde Controversial Statement
  2. राहुल गांधींनी अमेरिकेत केलेलं वक्तव्य संविधानाचा अपमान, आम्ही देशभर आंदोलन करणार; रामदास आठवलेंचा हल्लाबोल - Ramdas Athawale vs Rahul Gandhi
  3. आरक्षण रद्द करण्याचं कथित वक्तव्य; राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपा आक्रमक, आज राज्यभर आंदोलन - BJP Protest Against Rahul Gandhi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.