ETV Bharat / bharat

Punjab Hooch Tragedy : विषारी दारू प्यायल्याने चार नागरिकांचा गेला बळी, गावात उडाली खळबळ - Punjab Hooch Tragedy

Punjab Hooch Tragedy : पंजाबमधील दिरबाजवळच्या गुजरान गावात विषारी दारू प्यायल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाला. विषारी दारूनं चार नागरिकांचा बळी गेल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पंजाबचे अर्थमंत्री हरपाल चीमा यांचा हा मतदार संघ आहे.

Punjab Hooch Tragedy
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 11:11 AM IST

Updated : Mar 20, 2024, 12:14 PM IST

चंदीगड Punjab Hooch Tragedy : विषारी दारू प्यायल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना पंजाबमधील दिरबाजवळील गुजरान गावात आज सकाळी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे दिरबा हा अर्थमंत्री हरपाल चीमा यांचा मतदार संघ आहे. मात्र दिरबा इथं अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाल्याचं या घटनेवरुन दिसून येत आहे. या घटनेत भोला सिंग (50), निर्मल सिंग (42), प्रीत सिंग (42) आणि जगजीत सिंग (30) यांचा मृत्यू झाला आहे.

विषारी दारू पिल्यानं चार नागरिकांचा मृत्यू : दिरबाजवळील गुजरान गावात विषारी दारू प्यायल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. गुजरान इथल्या भोला सिंग (50), निर्मल सिंग (42), प्रीत सिंग (42) आणि जगजीत सिंग (30) यांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. चौघांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे. दिरबा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.

अर्थमंत्री हरपाल चीमा यांचा मतदारसंघ : गुजरान गावात विषारी दारू प्यायल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा मतदार संघ पंजाबचे अर्थमंत्री हरपाल चीमा यांचा आहे. दिरबा इथं मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप नागरिक करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विषारी दारू पिल्यानं झाला होता 112 नागरिकांचा मृत्यू : पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. लुधियाना इथं विषारी दारू पिल्यानं तब्बल 112 नागरिकांचा बळी गेल्याची घटना ऑगस्ट 2020 मध्ये घडली होती. या प्रकरणी एका रंग बनवणाऱ्या कंपनी मालकाला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात तब्बल 37 आरोपी होते.

हेही वाचा :

  1. Tamil Nadu Hooch Tragedy : विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा झाला 21, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस
  2. Villupuram Toxic Liquor : विषारी दारू पिल्यामुळे तामिळनाडूत दहा नागरिकांचा बळी, तीन महिलांचाही समावेश
  3. Bihar Hooch Tragedy : बिहारमध्ये विषारी दारूकांडात आत्तापर्यंत 22 बळी, 2 अधिकारी आणि 9 हवालदार निलंबित

Last Updated : Mar 20, 2024, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.