ETV Bharat / bharat

अंधत्व प्रतिबंध सप्ताह : डोळ्यांशी संबंधित 'या' समस्या तुम्हाला अंधत्व आणू शकतात, 'अशी' घ्या काळजी - Prevention Of Blindness Week - PREVENTION OF BLINDNESS WEEK

Prevention of Blindness Week : भारतात दरवर्षी 1 ते 7 एप्रिल हा आठवडा अंधत्व प्रतिबंधक सप्ताह म्हणून साजरा केला जातो. जन्मजात अंधत्व का येतं, उशिरानं अंधत्व येण्यामागं कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात, त्यावर उपाय आहेत की नाही असे अंधत्वाशी संबंधित पैलू समजून घेणे आणि ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे या उद्देशानं अंधत्व प्रतिबंधक सप्ताह साजरा करण्यात येतो.

prevention of blindness week by adopting precautions and timely treatment cases of temporary and permanent blindness can be reduced
अंधत्व प्रतिबंध सप्ताह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 11:15 PM IST

हैदराबाद Prevention of Blindness Week : डोळे निरोगी ठेवण्यासाठी, त्यांची काळजी घेणं आणि काही समस्या असल्यास त्यावर योग्य उपचारांसह त्यांची नियमित तपासणी करणं खूप महत्वाचं आहे. पण, अनेक लोक कधी माहितीच्या अभावामुळं, तर कधी निष्काळजीपणामुळं डोळ्यांच्या आरोग्याकडं दुर्लक्ष करतात. मात्र, यामुळं कायमचं किंवा तात्पुरतं अंधत्व येऊ शकतं, अद्यापही अनेकांना माहित नाही.

अंधत्व प्रतिबंधक सप्ताह साजरा करण्याचे उद्दिष्टं : डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोकांना जागरुक आणि शिक्षित करणं, त्यांना नियमितपणे नेत्रतपासणी करून घेण्यासाठी प्रवृत्त करणं, डोळ्यांशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येकडं दुर्लक्ष न करणं आणि कोणतीही समस्या उद्भवल्यास उपचारात निष्काळजीपणा न बाळगणे , ही सर्व अंधत्व प्रतिबंध सप्ताह साजरा करण्यामागची उद्दिष्ट आहेत.

अशी आहे आकडेवारी : राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 2022 पर्यंत भारतात सुमारे 4.95 दशलक्ष लोक पूर्ण अंधत्वानं ग्रस्त होते आणि सुमारे 70 दशलक्ष लोक दृष्टीहीन होते. त्यापैकी अंध मुलांची संख्या 0.24 दशलक्ष होती. विविध उपलब्ध आकडेवारी आणि माहितीनुसार, भारतातील सुमारे 68 लाख लोक दोन किंवा किमान एका डोळ्यातील कॉर्निया अंधत्वानं ग्रस्त आहेत. त्यापैकी दहा लाख लोक पूर्ण अंधत्वानं ग्रस्त आहेत. तर इतर आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी होणाऱ्या दृष्टीदोषाच्या सर्व प्रकरणांपैकी सुमारे 73% प्रकरणं अशी आहेत जी पूर्णपणे उपचार करण्याजोगी आहेत.

कारणं आणि प्रतिबंध : यासंदर्भात अधिक माहिती देत नवी दिल्लीतील नेत्रतज्ञ डॉ. आर. एस. अग्रवाल म्हणाले की, जन्मजात कारणांव्यतिरिक्त, काही वेळा अपघातामुळं किंवा डोळ्यांच्या आजारामुळं, डोळ्यांच्या ऑप्टिक नर्व्ह किंवा डोळ्यांच्या रेटिनाचा काही भाग प्रभावित झाल्यास, आंशिक किंवा कायमस्वरूपी दृष्टी कमी होऊ शकते. मॅक्युलर डिजेनेरेशन, काचबिंदू, मोतीबिंदू आणि डायबेटिक रेटिनोपॅथी यासह अनेक रोग आहेत ज्यांची वेळीच काळजी न घेतल्यास आंशिक किंवा पूर्ण अंधत्व येऊ शकतं.

पुढं ते म्हणाले की, "डोळ्यांच्या आरोग्याची काळजी किंवा उपचारात निष्काळजीपणा यांसारख्या सवयी पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये सामान्यपणे दिसून येतात. जे अनेक बाबतीत समस्या वाढवण्याचे कारण बनते. आजकाल, सर्व वयोगटातील लोकांमध्ये सर्व प्रकारच्या स्क्रीन टाइममध्ये वाढ झाल्यामुळं आणि शरीरात पोषणाची कमतरता यासारख्या समस्यांमुळं डोळ्यांचे आजार आणि समस्या वाढत आहेत. खरं तर, आजकाल लहान मुलं आणि प्रौढ दोघांच्याही ताटात जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न, चिप्स आणि असे खाद्यपदार्थ बघायला मिळतात. त्यामुळं अधिक समस्या उद्भवू शकतात. शरीरात पोषक नसल्यामुळं प्रत्येक अवयवाच्या आरोग्यावर परिणाम होतो. कधीकधी शरीराच्या इतर कोणत्याही भागावर परिणाम करणारा रोग (मधुमेह, लठ्ठपणा किंवा उच्च रक्तदाब इ.) डोळ्यांच्या आरोग्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम करू शकतो.

डोळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं :

  1. डोळ्यांचे व्यायाम करा
  2. डोळ्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या
  3. डोळ्यांची नियमित तपासणी करा
  4. पौष्टिक आहाराचं सेवन करावं
  5. स्मार्ट स्क्रीन वापरताना काळजी घ्या
  6. पूर्ण झोप घ्या आणि कामाच्या दरम्यानही थोड्या अंतरानं डोळ्यांना विश्रांती देण्याचा प्रयत्न करा
  7. डोळ्यांना खाज, कोरडेपणा किंवा तात्पुरती अंधुक दिसणं यासारख्या छोट्याशा समस्यांकडंही दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या

विविध कार्यक्रमांचे आयोजन : आजच्या युगात आरोग्य राखण्यासंबंधीची माहिती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होत असतानाही, लोक त्यांच्या आरोग्याबाबत, विशेषत: डोळ्यांच्या आरोग्याबाबत जाणून-बुजून बेफिकीर राहतात. डोळ्यांना त्रास होत असतानाही अनेक लोक वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. डोळ्यांची किरकोळ समस्या किंवा इतर कोणताही आजार किंवा स्थिती कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या अंधत्वाचं कारण बनू नये म्हणून सर्वसामान्यांना जागरूक आणि जबाबदार बनवण्याच्या उद्देशानं दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्तानं अंध व्यक्तींच्या उन्नती आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाते. विशेष म्हणजे अंधत्व निवारण सप्ताहादरम्यान सरकारी आणि निमसरकारी संस्थांमार्फत संपूर्ण आठवडाभर अनेक शासकीय केंद्रे आणि खासगी रुग्णालयांमध्ये नेत्र निगा आणि तपासणीबाबत शिबिरं आणि विविध प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात.

हेही वाचा -

  1. देवाने डोळे दिले पण नजर दिली डॉक्टरांनी; दोन वर्षांच्या मुलीवर झाली यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया
  2. Cataract treatment in monsoon : पावसाळ्याच्या दिवसात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी की नाही ? जाणून घ्या उपाय...
  3. Lion Riyaz Eye Operation : सिंहाला झाला मोतीबिंदू! आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार ऑपरेशन!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.