बंगळुरू Prajwal Revanna Case : जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याची बुधवारी शहरातील बोरिंग हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणी करण्यात आली. न्यायालयाकडून परवानगी मिळालेल्या एसआयटी अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता त्यांना रुग्णालयात नेलं. प्रज्वल याची बोअरिंग हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानं वैद्यकीय तपासणी केली. लैंगिक क्रिया करण्याची पौरुषत्वाची चाचणी करण्यात आली. तपासणीनंतर सायंकाळी त्याला सीआयडी कार्यालयात नेलं. एसआयटीनं त्याची चौकशी केली. आणखी एका आठवड्यात अहवाल एसआयटीकडं पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आज पुन्हा कोर्टात हजर करणार : एसआयटीनं दोन दिवसांपूर्वी प्रज्वल रेवन्नाला 'पॉटेन्सी टेस्टसाठी' बोअरिंग हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी काही वैद्यकीय चाचण्यांसाठी कायदेशीर माहिती दिली. त्यामुळं न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर एसआयटीनं त्याला बुधवारी पुन्हा रुग्णालयात नेलं. न्यायालयाच्या मान्यतेनं प्रज्वल रेवन्नाच्या वैद्यकीय तपासणीसाठी बोअरिंग हॉस्पिटलच्या प्रमुखांनी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली होती. कोर्टानं त्याच्या एसआयटीला 6 जूनपर्यंत कोठडी दिली होती. कोठडीची मुदत आज संपल्यानं एसआयटी त्याला आज पुन्हा कोर्टात हजर करणार आहे.
लैंगिक शोषण प्रकरणात प्रज्वल रेवन्ना अटक : जेडीएसचा माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याच्यावर महिलांचं कथित लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. हा आरोप केल्यानंतर त्यानं जर्मनीला पळ काढला होता. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर प्रज्वल रेवन्ना हा भारतात परतला. देशात परतताच त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पथकांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर प्रज्वल रेवन्नाला विशेष तपास पथकाच्या ( एसआयटी ) ताब्यात देण्यात आलं होतं. खासदार प्रज्वल रेवन्ना याच्याविरुद्ध न्यायालयीन वॉरंट प्रलंबित होते. औपचारिकतेनंतर एसआयटीनं प्रज्वल रेवन्ना याला अटक केली आहे.
हेही वाचा -
- सेक्स स्कँडलमधील आरोपी जेडीएस उमेदवार प्रज्वल रेवन्ना याचा दारुण पराभव - Lok Sabha election results 2024
- लैंगिक शोषण प्रकरण : प्रज्वल रेवन्ना देशात येताच अटक; 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी - Sexual Abuse Case
- सेक्स स्कँडलनंतर प्रज्वल रेवन्ना पहिल्यांदाच आला समोर; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला, "31 मे रोजी सकाळी...." - Prajwal Revanna Video