कांकेर : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेठिया पोलीस स्टेशन हद्दीतील हिदूर जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. शोध मोहिमेवर असलेल्या सुरक्षा दलांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. बस्तर फायटरचे कॉन्स्टेबल रमेश कुरेठी यांना चकमकीत वीरमरण आले आहे. दीड तासापासून चकमक सुरू राहिली. कांकेरचे पोलीस अधीक्षक आयके एलिसेला यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.
शोध मोहिमेवर असताना हल्ला : आज कांकेर पोलीस ठाण्याच्या छोटाबेठिया हद्दीतील हिदूरच्या जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्यांचा शोध घेण्याची मोहिम सुरू केली होती. मात्र, त्या अगोदरच सापळा लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. कांकेर डीआरजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू आहे. आजूबाजूच्या परिसरात पोलीस दल, बीएसएफ, डीआरजीकडून शोधमोहीम सुरू आहे.
एक जावान शहीद : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज छोटाबेठिया पोलीस स्टेशन अंतर्गत हिदूर गावाजवळील जंगलात सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियान सुरू असताना गोळीबार झाला. हिदूरच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली. राज्य पोलिसांची एक तुकडी असलेल्या बस्तर फायटर्सचे शिपाई रमेश कुरेठी यांना चकमकीत वीरमरण आले. शहीद रमेश कुरेठी हे कांकेर जिल्ह्यातील पाखंजूर येथील संगम गावचे रहिवासी आहेत. या चकमकीत एक नक्षलवादीही ठार झाला आहे. घटनास्थळावरून गणवेशधारी नक्षलवाद्याचा मृतदेह, एके-47 बंदूक जप्त करण्यात आली आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
27 फेब्रुवारीला विजापूरमध्ये चकमक झाली : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सातत्यानं चकमक सुरूच असतात. मंगळवारी विजापूरच्या जंगला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटे तुंगली जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत जवानांनी 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. जवानांनी घटनास्थळावरून ठार झालेल्या माओवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त केली आहेत. सोमवारी संध्याकाळी कांकेरच्या कोयलीबेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्परस जंगलात नक्षलवादी आणि डीआरजी जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत जवानांनी 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.
हे वाचलंत का :