ETV Bharat / bharat

12 राज्यांचे मुख्यमंत्री, 20 केंद्रीय मंत्री, 20 किमीचा 'रोड शो'; उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी मोदी करणार शक्तीप्रदर्शन - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

PM Narendra Modi Road Show in Varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या रॅलीत 12 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व 'एनडीए'तले नेते, खासदार, आमदार सहभागी होणार आहेत.

PM Modi Road Show in Varanasi
PM मोदींच्या नामांकन रॅलीत 12 मुख्यमंत्री होणार सहभागी (ETV Bharat Maharashtra)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 8:26 PM IST

नवी दिल्ली PM Narendra Modi Road Show in Varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 1 जून रोजी मतदान होणार आहे. पीएम मोदी सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यासाठी ते 14 मे रोजी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं भाजपानं जोरदार तयारी सुरू केलीय. पंतप्रधान मोदींच्या नामांकन रॅलीत देशातील 12 राज्यांचे मुख्यमंत्री, 20 केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री, खासदार, आमदार सहभागी होणार आहेत. यासोबतच एनडीए आघाडीतील सर्व पक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत.

6 किमी लांबीचा रोड शो : उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी PM मोदी सोमवारी वाराणसीमध्ये मेगा रोड शो करणार आहेत. पंतप्रधानांचा 6 किलोमीटर लांबीचा रोड शो बनारस हिंदू विद्यापीठातून दुपारी 4 वाजता सुरू होऊन काशी विश्वनाथ मंदिरात सांगता होईल. यावेळी वाराणसीतील लोक त्यांचं स्वागत करतील. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी सोनारपुरा, गोदौलिया, बन्सफाटक मार्गे लंका चौरस्त्यावरून काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचतील. मंगळवारी, 14 मे रोजी नामांकन भरण्यापूर्वी पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरात विशेष पूजा करतील. यानंतर ते कालभैरव मंदिरात जाऊन विशेष पूजा करणार आहेत.

अमित शाह, योगी वाराणसीत : पीएम मोदींचा रोड शो भव्यदिव्य करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी वाराणसीत दाखल झाले आहेत. दोन्ही नेते मोदींच्या 'रोड शो'च्या तयारीचा आढावा घेतील. यावेळी पंतप्रधान मोदी 20 तासांहून अधिक काळ वाराणसीमध्ये राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

'रोड शो'साठी सर्वसामान्यांना निमंत्रण : भाजपानं पीएम मोदींच्या रोड 'शो'साठी 10 लाख लोकांना जमवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी समस्त काशीवासीयांना खुलं निमंत्रण देण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी वाराणसीतील सर्वसामान्यांना पहिल्यांदाच आमंत्रित करण्यात आलं आहे.

हे वाचलंत का :

  1. तुमचं मतदान कार्ड हरवलंय? काळजी करू नका, 'ही' ओळखपत्र सोबत ठेवून करू शकतात मतदान - Lok Sabha Election 2024
  2. तुरुंगातून सुटून आलेल्या अरविंद केजरीवाल यांचा मोदींच्या गॅरंटीला मोठा शह, जाहीर केली मोठी घोषणा - Arvind Kejriwal news
  3. 'पुष्पा' अडचणीत, आमदार मित्राच्या प्रचारासाठी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल - andhra pradesh elections 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.