ETV Bharat / bharat

'गगनयान' मोहिमेअंतर्गत चार भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवले जाणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

इस्रोच्या आगामी महत्वकांक्षी मोहिमेतील एक मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय. गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवले जाणार आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 1:55 PM IST

Updated : Feb 27, 2024, 2:10 PM IST

केरळ Gaganyaan Team Announce : गगनयानबाबत मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलीय. सहा टन वजानाची अवकाश कुपी अवकाशात पाठवली जाणार आहे. चार अंतराळवीरांना सामवण्याची क्षमता या कुपीची असणार आहे. ही अवकाश कुपी पृथ्वीपासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर तीन दिवस प्रदक्षिणा घालणार आहे.

चार अंतराळवीरांची नावे जाहीर : यासाठी चार अंतराळवीरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. प्रशांत बाळकृष्ण नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला अशी ही चार नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ दौऱ्यात या चार अंतराळवीरांची नावे जाहीर करत त्यांना अंतिम तयारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अंतराळवीरांना देण्यात येतंय प्रशिक्षण : चारही अंतराळवीरांना बेंगळुरुतील संस्थेमध्ये प्रशिक्षण दिलं जातंय. गगनयान मिशन हा भारताचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. भारतानं जर हे मिशन यशस्वी केलं तर अंतराळात व्यक्तीला पाठवणारा भारत चौथा देश ठरणार आहे. या प्रोजेक्टसाठी सध्या लाखो शास्त्रज्ञ युद्धपातळीवर काम करत आहेत. गगनयान मिशन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीय.

काय आहे गगनयन मिशन? : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधताना लवकरच भारतीयांना अंतराळात पाठवणार असल्याचं म्हटलं होतं. या मोहिमेसाठी तब्बल 10 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. गगनयान मोहिमेसाठी इस्रोने बंगळुरूमधल्या मुख्यालयात ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर उभारलं आहे. या मोहिमेअंतर्गत चार अंतराळवीरांना अंतराळात पाठवून त्यांना सुरक्षित पृथ्वीवर आणलं जाणार आहे. अंतराळ मोहिमेच्या कुठल्याही टप्प्यात अंतराळवीरांना धोका निर्माण झाल्यास त्यांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याासाठी रॉकेटपासून वेगळं करणारी चाचणीही यशस्वीरित्या पार पाडण्यात आलीय.

हेही वाचा - सागर मोहिमेसाठी भारत सज्ज; 'MATSYA 6000' मिशनची लवकरच होणार चाचणी

Last Updated : Feb 27, 2024, 2:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.