गुवाहाटी : गुवाहाटी शहरातील एका व्यावसायिकानं आपल्या मेहनतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य पुतळा उभारण्याचं ठरवलं आहे. या पुतळ्याची उंची 190 फूट असणार आहे. हा पुतळा नबीनचंद्र बोरा या नावाजलेल्या व्यावसायिकाच्या प्रयत्नातून उभारला जाणार आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे चाहते आहेत. 'हे माझे नरेंद्र मोदींवरील प्रेम आहे. ते जगातील सर्वोत्तम पंतप्रधानांपैकी एक आहेत. अशा व्यक्तीचा पुतळा घडवता आला हे माझं भाग्य आहे. हे माझं निस्वार्थी कार्य आहे. माझे हितसंबंध यात गुंतलेले नाहीत. मी राजकारण करणारी व्यक्ती नाही. मी एक सामान्य व्यक्ती आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
पुतळा 60 फूट जागेवर बसवण्यात येणार : उद्योगपती नबीन बोरा हे गुवाहाटी येथील जलुकबारी येथील मुख्य बसस्थानकाजवळ स्वतःच्या जमिनीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य पुतळा बसवणार आहेत. पुतळ्याच्या उभारणीसाठी त्यांनी सोमवारपासून तीन दिवसीय भूमिपूजन सुरू केलं आहे. दरम्यान, त्यांनी ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. ते म्हणाले, आपण आपल्या कमाईचा वापर करून सुमारे 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये जमिनीवर पुतळा बसवणार आहेत. हा पुतळा 60 फूट जागेवर बसवण्यात येणार आहे. या 60 फुट जागेसह पुतळ्याची उंची 250 फूट असणार आहे.
या वर्षी कामाला सुरुवात होणार : नवीनचंद्र बोरा यांनी कांस्य पुतळ्याची अंतिम रचना तयार केली आहे. त्यानुसार, या 190 फूट उंच पुतळ्याच्या गळ्यात गामोसा हे आसामी संस्कृतीचं प्रतीक असेल. तसंच, त्यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला एक पत्रही पाठवलं होतं. ज्यामध्ये त्यांनी पुतळा बसवण्याच्या योजनेची माहिती दिली होती. पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात त्यांनी हे 200 कोटी रुपये आपण कष्टाने कमावलेले आहेत, असंही त्यांनी त्यामध्ये नमूद केल होत. याबरोबरच, 2016 मध्ये पंतप्रधानांचं कौतुक पत्र मिळाल्यानंतर एवढा मोठा पुतळा बसवण्याची योजना त्यांनी आखली होती. या वर्षी कामाला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान स्वत:च्या हाताने पुतळ्याचं अनावरण करतील, अशी आशा असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :
2 "...तर लवकरच देशात हुकूमशाही येईल", मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींना उद्देशून मोठा इशारा
3 फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आज जयपूर दौर्यावर; पंतप्रधान मोदींसोबत करणार 'रोड शो'