नवी दिल्ली GST On Petrol Diesel Price : सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगणाला भिडेल आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगणाला भिडल्यानं नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणल्यास देशातील पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते. शनिवारी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतचं भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणू इच्छित आहे. आता याबाबत राज्यांनी निर्णय घ्यायचा असून त्यांनी एकत्र येऊन दर ठरवावेत."
पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी हालचाली : शनिवारी जीएसटी कौन्सिलची बैठक अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी माध्यमांशी बोलताना पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याविषयी भाष्य केलं. "सरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणू इच्छित आहे. मात्र याबाबत राज्यांनी निर्णय घ्यायचा आहे. राज्य सरकारनं एकत्र येऊन दर ठरवावेत," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पेट्रोल, डिझेलवर उत्पादन शुल्क : सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानं नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारलं जाते. तर राज्य सरकार व्हॅट गोळा करते. वाहतूक खर्च, डीलर कमिशनचा समावेश केल्यानंतर पेट्रोल आणि डिजेलची अंतिम किंमत ठरवली जाते. दिल्लीत पेट्रोलची मूळ किंमत 55.46 रुपये असून यावर 19.90 रुपये उत्पादन शुल्क आणि 15.39 रुपये व्हॅट लागू आहे. वाहतूक खर्च आणि डीलर कमिशन 20 पैसे आणि 3.77 रुपये आहे. असे सगळे मिलून अंतिम किंमत 94.72 रुपये इतकी आहे. दिल्लीत डिझेलची मूळ किंमत 56.20 रुपये असून त्यावर 15.80 रुपये उत्पादन शुल्क तर 12.82 रुपये व्हॅट लागू आहे. वाहतूक खर्च, डीलर कमिशन अनुक्रमे 22 पैसे आणि 2.58 रुपये आहे. त्यावरुन अंतिम किंमत 87.62 रुपये इतकी ठरवण्यात आली आहे.
पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यास होणार फायदा : पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर खूप मोठा फायदा होणार आहे. जीएसटीचा कमाल दर 28 टक्के इतका आहे. दिल्लीत पेट्रोलची मूळ किंमत 55.46 रुपये असून त्यावर 28 टक्के जीएसटी लावल्यास हा कर 15.58 रुपये इतका होतो. वाहतूक खर्च, डीलर कमिशन अनुक्रमे 20 पैसे आणि 3.77 रुपये जोडल्यास किंमत 75.01 रुपये इतकी होणार आहे. त्यामुळे पेट्रोल 19.7 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :