नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी आज प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आज सकाळी लोकसभा सुरू झाल्यानंतर लगेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर कथित अदानी प्रकरणावरुन आरोप करण्यास सुरुवात केली. मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर सोरोस प्रकरणावरुन आरोप केल्यानं मोठा गदारोळ झाला. विरोधकांच्या प्रचंड गदारोळानंतर लोकसभा अध्यक्षांनी सभागृह उद्यापर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली. तर दुसरीकडं राज्यसभा सभापतींनीही विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृह उद्यापर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली.
#WATCH | Delhi: Congress MP Kiran Kumar Chamala says, " today it was clearly visible that we, the opposition were quiet to make sure that the house runs. but the speaker came in with an attitude of not running the house. he was trying to provoke the opposition... the ruling party… pic.twitter.com/yt4AKnfvBC
— ANI (@ANI) December 10, 2024
विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप : संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 मध्ये आज चांगलाच वाद रंगला. आज सकाळीच लोकसभा आणि राज्यसभा तहकूब करण्यात आल्यानं विरोधकांनी मोठा हल्लाबोल केला. काँग्रेस खासदार किरण कुमार चमला म्हणाले, की "आज सकाळी आम्ही सभागृह चालावं या इराद्यानं सभागृहात दाखल झालो. मात्र अध्यक्ष सभागृह न चालवण्याच्या इराद्यानं आले असावेत. त्यांनी विरोधकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाचे सदस्य आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे हिवाळी अधिवेशन होऊ नये, अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे," असा आरोप त्यांनी केला.
#WATCH | Delhi: On Former Bihar CM and RJD chief Lalu Yadav's statement regarding Mamata Banerjee leading the INDIA Bloc, JMM MP Mahua Maji says, " ...there is no official statement from our party yet. i cannot say anything about it. every party has their opinion. when the meeting… pic.twitter.com/Ck6ho2Reop
— ANI (@ANI) December 10, 2024
विरोधकांची प्रचंड घोषणाबाजी : विरोधकांनी सभागृहात गदारोळ केल्यानंतर सत्ताधारी खासदारांनीही मोठी घोषणाबाजी केली. विरोधक कथित अदानी लाच प्रकरणावर संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी करत होते. यावरुन सत्ताधाऱ्यांनीही सोरोस प्रकरणावरुन मोठी घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर विरोधकांनी संसद परिसरात मोठी घोषणाबाजी केली.
Winter session of Parliament | Lok Sabha adjourned till tomorrow, 11th December, amid ruckus in the House pic.twitter.com/nBNlPdboXu
— ANI (@ANI) December 10, 2024
काँग्रेसनं उत्तर द्यायला हवं, राजीव प्रताप रुडींचा हल्लाबोल : विरोधकांनी आज सकाळी संसदेत मोठी घोषणाबाजी केल्यानं दोन्ही सभागृह उद्यापर्यंत तहकूब कऱण्यात आले आहेत. त्यावर भाजपा खासदार राजीव प्रताप रुडी यांनी मोठा हल्लाबोल केला. "एकीकडं प्रचंड घोषणाबाजी करुन गदारोळ करायचा आणि दुसरीकडं सभागृह चालू ठेवण्याची मागणी करायची ही दुटप्पी बाब आहे. याबाबत काँग्रेसला उत्तर द्यावं लागेल," असा हल्लाबोल त्यांनी केला.
Winter session of Parliament | Lok Sabha adjourned till tomorrow, 11th December, amid ruckus in the House pic.twitter.com/nBNlPdboXu
— ANI (@ANI) December 10, 2024
हेही वाचा :
#WATCH | Delhi | After both Houses are adjourned till noon, Opposition MPs protest on the steps of the Parliament on Adani issue, demand reply from the government on the issue pic.twitter.com/S6g59PDBHw
— ANI (@ANI) December 10, 2024