ETV Bharat / bharat

संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : "देशाच्या पहिल्या अंतरिम सरकारनं..."निर्मला सीतारामण यांची काँग्रेसवर टीका - PARLIAMENT WINTER SESSION 2024

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी (16 डिसेंबर) राज्यसभेत संविधानावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर आपल्या कार्यकाळात संविधानाचा गैरवापर केल्याचा आरोप केला.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाअंतर्गत (Parliament Winter Session 2024) सोमवारी (16 डिसेंबर) पुन्हा एकदा दोन्ही सभागृहांचे (लोकसभा आणि राज्यसभा) कामकाज सुरू झाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी राज्यसभेत चर्चेला सुरुवात केली.

निर्मला सीतारामण काय म्हणाल्या? : राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, "आपण आपल्या राज्यघटनेचे 75 वे वर्ष साजरे करत असताना मला वाटतं की अशा भारताच्या निर्मितीसाठी आपण आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याची वेळ आलीय. दुसऱ्या महायुद्धानंतर 50 हून अधिक देश स्वतंत्र झाले. त्यांची राज्यघटना लिहिली गेली. परंतु अनेक देशांनी आपली राज्यघटना बदलली आहे. त्यांनी त्यामध्ये केवळ सुधारणा केल्या नाहीत, तर त्यांच्या संविधानाचे संपूर्ण वैशिष्ट्य अक्षरशः बदलले आहे. परंतु अनेक दुरुस्त्या आणि बदल करूनही आपली राज्यघटना काळाच्या कसोटीवर उतरली आहे."

कॉंग्रेसवर हल्लाबोल : पुढं त्या म्हणाल्या, "1950 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं 'क्रॉस रोड्स' या कम्युनिस्ट मासिकाच्या बाजूनं आणि आरएसएसच्या संघटनात्मक मासिक 'ऑर्गनायझर'च्या बाजूनं निकाल दिला होता. पण प्रत्युत्तरादाखल (तत्कालीन) अंतरिम सरकारनं विचार केला की प्रथम घटनादुरुस्तीची गरज आहे आणि ती काँग्रेसनं आणली. हे मूलत: स्वातंत्र्यावर घाला घालणारे होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भारताला आजही अभिमान आहे. भारतीयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याच्या उद्देशानं घटनादुरुस्ती करून पहिले अंतरिम सरकार सत्तेत आले", असा आरोप निर्मला सीतारामण यांनी केला.

हेही वाचा -

  1. संसद ठप्प! विरोधी पक्षाच्या गदारोळामुळं कामकाज आजही तहकूब
  2. अदानी ग्रुपवरील आरोपांवरून संसदेत गदारोळ, राज्यसभेसह लोकसभेचे कामकाज दिवसभराकरिता स्थगित
  3. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ; 'या' मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता - parliament budget session

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.