नवी दिल्ली Rahul Gandhi in Lok Sabha : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आजदेखील चर्चा होणार आहे. जर आज राहुल गांधी यांनी सभागृहात आक्रमकपणे भाषण केले तर संसदेत मोठा गदारोळ होऊ शकतो.
काँग्रेस लोकसभा खासदारांसोबतच्या बैठकीत राहुल गांधी म्हणाले होते की, संसदेच्या विशेष सत्रादरम्यान ते यापूर्वीच बोलले आहेत. त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्याऐवजी इतरांनाही संधी दिली जावी, असं राहुल गांधीचं मत आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे खासदार हे विरोधी पक्षनेते या नात्यानं राहुल गांधी यांच्या भाषणाचा सभागृहात मोठा प्रभाव पडेल. त्यामुळं त्यांनी बोलावं यासाठी काँग्रेस खासदारांकडून आग्रह करण्यात येत आहे. त्याबाबत राहुल गांधी यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. खासदारांच्या दबावामुळं राहुल गांधी संसदेत बोलण्याबाबत आज सकाळी निर्णय घेणार आहेत.
सत्ता वाचवण्याच्या लालसेपोटी इतर राज्यांची उपेक्षा : मंगळवारी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावरून यापूर्वीच राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला. सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा भारताच्या संघराज्याच्या प्रतिष्ठेवर हल्ला असल्याचं विरोधी पक्षनेते म्हणाले होते. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, "हा अर्थसंकल्प म्हणजे भारताच्या रचनेच्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे. सत्ता वाचवण्याच्या लालसेपोटी देशातील इतर राज्यांकडं दुर्लक्ष करण्यात आलंय. त्यांच्याशी भेदभाव करण्यात आला आहे." तर शुक्रवारी संसदेच्या आवारात इंडिया आघाडीनं अर्थसंकल्पाचा निषेध केला. यावेळी काँग्रेस खासदारदेखील सहभागी झाले होते.
सरकार वाचवण्यासाठी अर्थसंकल्प : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यांविरुद्ध भेदभाव केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, "निर्मला सीतारामन यांच्या भाषणात फक्त दोन राज्यांच्या प्रकल्पांचा उल्लेख होता. असा अर्थसंकल्प कधीच मांडण्यात आला नाही. जेडीयू आणि टीडीपीच्या पाठिंब्यावर अवलंबून असलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे," असा आरोप खरगे यांनी केला.
हेही वाचा -
- "केंद्रीय अर्थसंकल्प विजय वडेट्टीवारांनादेखील भावला"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला - UNION BUDGET 2024
- शहरांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा अन्वयार्थ : संभावना आणि आव्हाने - UNION BUDGET 2024 25 FOR CITIES
- "केंद्र सरकारचा गोडवा गाणाऱ्या महायुतीनं महाराष्ट्रासाठी काय आणलं?"; अर्थसंकल्पावरुन विरोधकांची सरकारवर टीका - Union Budget 2024