ETV Bharat / bharat

बिहारमध्ये भीषण अपघात; दुचाकीला धडक देऊन स्कॉर्पिओची ट्रकला धडक, 9 जणांचा मृत्यू - Nine Killed Kaimur Accident

Kaimur Accident : बिहारच्या कैमूरमध्ये रविवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झालाय. यानंतर घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या अपघाताची (Car Container Accident Bihar) माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं

बिहारमध्ये भीषण अपघात; दुचाकीला धडक देऊन स्कॉर्पिओची ट्रकला धडक, 9 जणांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 6:29 AM IST

Updated : Feb 26, 2024, 6:43 AM IST

बिहारमध्ये भीषण अपघात

कैमूर (बिहार) Kaimur Accident : बिहारमधील कैमूर इथं भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झालाय. ही घटना जिल्ह्यातील मोहनिया पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 2 वर असलेल्या देवकालीजवळ घडलीय. एका स्कॉर्पिओनं अनेक वाहनांना धडक देऊन ट्रकला (Car Container Accident Bihar) धडक दिली. या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावर बराच काळ वाहतूक जाम झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी वाहनातून मृतदेह बाहेर काढले.

भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्या 9 लोकांपैकी 8 लोक स्कॉर्पिओमध्ये प्रवास करत होते. तर एका दुचाकी चालकाचाही यात मृत्यू झालाय. सासारामहून वाराणसीच्या दिशेनं स्कॉर्पिओ जात होती. मोहनिया जवळील देवकाली गावाजवळ येताच स्कॉर्पिओनं दुचाकीला धडक दिली. यानंतर स्कॉर्पिओचं नियंत्रण सुटलं आणि दुभाजक ओलांडून रस्त्याच्या ती दुसऱ्या लेनमध्ये गेली. त्यानंतर दुसऱ्या लेनमध्ये येणाऱ्या कंटेनरची स्कॉर्पिओला जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की स्कॉर्पिओचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर दुचाकी चालक आणि स्कॉर्पिओ चालकासह 9 जणांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह स्कॉर्पिओमधून बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

स्कॉर्पिओ सासारामहून यूपीकडे जात होती : घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेले मोहनिया 'एसडीपीओ' दिलीप कुमार यांनी सांगितलं की, "स्कॉर्पिओ रोहतास जिल्ह्यातून येत होती आणि मोहनियामार्गे यूपीकडं जात होती. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात स्कॉर्पिओ दुभाजक ओलांडून पलीकडून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झालाय. मृतांची ओळख पटवली जात आहे. मृत्युमुखी पडलेले लोक कुठले आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही."

हेही वाचा :

  1. उत्तर प्रदेशात मोठा अपघात; पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 7 लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू
  2. ट्रक आणि रिक्षाची भीषण धडक; 9 प्रवाशांचा मृत्यू, 5 जण गंभीर
  3. हरियाणात भरधाव कारनं दुचाकीस्वारांना चिरडलं, 4 वेटरचा जागीच मृत्यू; सीसीटीव्ही पाहून येईल अंगावर काटा

Last Updated : Feb 26, 2024, 6:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.