ETV Bharat / bharat

NEET-UG पेपर लीक प्रकरणात नवीन गुन्हा दाखल, CBI तपासासाठी पाटणा, गोध्राला जाणार - NEET UG Paper Leak Case - NEET UG PAPER LEAK CASE

NEET UG Paper Leak Case : केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं (CBI) NEET परीक्षा प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात केंद्र सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडं सोपवण्याबाबत आधीच वक्तव्य केलं होतं. सीबीआयची विशेष पथकं या प्रकरणाच्या तपासासाठी पाटणा, गोध्राला जाणार आहेत.

NEET UG Paper Leak Case
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (Etv Bharat National Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 6:48 PM IST

Updated : Jun 23, 2024, 7:31 PM IST

नवी दिल्ली NEET UG Paper Leak Case : NEET संदर्भात विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान, CBI आता NEET परीक्षेच्या मुद्द्यावर ॲक्शन मोडमध्ये आहे. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं (CBI) 5 मे रोजी झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील NEET-UG मधील कथित अनियमिततेच्या संदर्भात एफआयआर नोंदवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

गुन्हा दाखल : सीबीआयनं गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयनं विशेष पथकं तयार केली आहेत. सीबीआयची विशेष पथके पाटणा, गोध्राला तपासाठी जाणार आहेत. या संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या संदर्भावरून सीबीआयनं अज्ञात लोकांविरुद्ध नवीन गुन्हा दाखल केला आहे. सुमारे 24 लाख विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिली होती." NEET मधील कथित गैरप्रकारांच्या चौकशीबाबत अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळं सरकारला नमतं घ्यावं लागल्याचं बोललं जात आहे.

तपास सीबीआयकडं सोपवला : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 5 मे रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत कथित अनियमितता, गैरप्रकारांची काही प्रकरणं समोर आली आहेत. परिणामी, प्रक्रियेतील पारदर्शकतेचा आढावा घेतल्यानंतर हे प्रकरण सविस्तर तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडं सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी शनिवारी (२२ जून) केंद्र सरकारनं NEET प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवण्याचा निर्णय घेतला होता. सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण मंत्रालयानं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवला आहे. 'NEET-UG परीक्षासोबतच, आणखी तीन परीक्षा UGC-NET, CSIR-UGC NET तसंच NEET-PG देखील वादात सापडल्या आहेत. केंद्र सरकारनं UGC NET परीक्षा रद्द केली आहे, तर CSIR, UGC NET, NEET PG परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहेत.

'हे' वाचलंत का :

  1. नीट परीक्षेचा घोळ थांबेना : पेपर फुटीसह शिक्षण माफियांसमोर पंतप्रधान मोदी हतबल झालेत, विरोधकांचा हल्लाबोल - NEET PG Exam Postponed
  2. पेपर लीक प्रकरणी NTA चे महासंचालक सुबोध सिंग यांची हकालपट्टी, आतापर्यंत 19 जणांना अटक - NEET Paper Leak Case
  3. पेपर फुटला तर आता खैर नाही, होऊ शकतो १ कोटी रुपयांचा दंड, १० वर्षे तुरुंगवास; पेपर लीक विरोधी कायदा लागू - Anti Paper Leak Act

Last Updated : Jun 23, 2024, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.