ETV Bharat / bharat

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 12 नक्षलवाद्यांचा खात्मा - encounter in pedia forests - ENCOUNTER IN PEDIA FORESTS

Police Naxalite Encounter : छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत. सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पोलीस नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत.

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान (Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 10, 2024, 8:00 PM IST

बीजापूर Police Naxalite Encounter : छत्तीसगडमधील बीजापुरमध्ये शुक्रवारी नक्षलविरोधी अभियानात जवानांना मोठं यश मिळालंय. शुक्रवारी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत जवानांनी 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर पोलीस पथक ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात व्यस्त आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. परिसरात सतत शोध सुरु आहे. बस्तर डीआयजी कमलोचन कश्यप यांनी याला दुजोरा दिलाय.

काय म्हणाले मुख्यमंत्री विष्णू देव साई : यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांची यावर प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी ऑपरेशनच्या यशासाठी जवानांचं अभिनंदन केलंय. ते म्हणाले की, ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. बीजापुरमध्ये पोलिस-नक्षल चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगडमध्ये आम्ही सत्तेत आल्यापासून आम्ही नक्षलवादाचा जोरदार मुकाबला करत आहोत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही इच्छा आहे की छत्तीसगडमधून नक्षलवाद संपला पाहिजे आणि जर दुहेरी इंजिन सरकार असेल तर त्याचे फायदे आम्हालाही मिळायला हवेत, असं साई म्हणाले.

सकाळपासून सुरु होती चकमक : मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते. घटनास्थळावरुन ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. तीन जिल्ह्यातील जवान नक्षलविरोधी अभियानात उतरले होते. बीजापूर, दंतेवाडा आणि सुकमा इथून सुमारे 1000 DRG, STF, COBRA आणि CRPF जवान नक्षलविरोधी अभियानात उतरले आहेत. शुक्रवारी सकाळी सहा वाजता ही चकमक सुरु झाली होती. मोठ्या नक्षलवादी नेत्यांच्या उपस्थितीच्या इशाऱ्यावरुन ही कारवाई सुरु करण्यात आलीय. तीन जिल्ह्यांचे बस्तर आयजी, डीआयजी आणि एसपी ऑपरेशन आणि एन्काउंटरवर लक्ष ठेवून आहेत. ही चकमक गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेडिया जंगलात झाली.

हेही वाचा :

  1. Chhattisgarh Assembly Elections 2023 : छत्तीसगड विधानसभा मतदानाला सुरुवात; नक्षलवाद्यांचा निवडणुकीत धुमाकूळ, आयईडी स्फोटात एक जवान जखमी
  2. How Naxal Problem Be Solved : नक्षलवादापासून कशी मिळू शकते सुटका; नक्षल तज्ज्ञांनी सांगितला हा मार्ग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.