ETV Bharat / bharat

महाराष्ट्राच्या सीमेवर 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांमध्ये 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश - Naxal encounter in Abujhmad - NAXAL ENCOUNTER IN ABUJHMAD

Naxal encounter in Abujhmad : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. ज्यामध्ये 3 महिलांसह 7 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

Naxal encounter in Abujhmad
Naxal encounter in Abujhmad
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 8:17 PM IST

Updated : Apr 30, 2024, 8:31 PM IST

गृहमंत्री विजय शर्मा यांची प्रतिक्रिया

बस्तर/नारायणपूर Naxal encounter in Abujhmad : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलानं मोठी कारवाई केलीय. मंगळवारी नारायणपूर, कांकेर तसंच महाराष्ट्राच्या सीमेवर सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांसोबत मोठी चकमक झाली. या चकमकीत एकूण 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. यापूर्वी 16 एप्रिल रोजी कांकेरच्या छोटाबेठिया येथे सुरक्षा दलानं मोठ्या नक्षलवादी कारवाईत 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

कुठे झाली चकमक : सकाळी 6 वाजता सुरक्षा दलाचं पथक अबुझमाड भागात ऑपरेशनसाठी निघालं होतं. त्यावेळी टेकमेटा तसंच काकूर गावांदरम्यानच्या जंगलात सुरक्षा दलाचा नक्षलवाद्यामध्ये चमक झाली. या कारवाईत डीआरजी, स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलविरोधी पथक सहभागी झालं होतं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या पथकानं रात्रीपासूनच नारायणपूरच्या अबुझमाडमध्ये कारवाई सुरू केली होती. या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले आहेत.

9 तास चालली चकमक : नारायणपूरच्या अबुझमाडमध्ये सुमारे 9 तास चकमक सुरू होती. ज्यामध्ये 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. तसंच या कारवाईत सात पुरुष नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी एक इन्सास रायफल आणि एके 47 रायफल जप्त केली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

सुरक्षा दलाचे जवान सुरक्षीत : या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना कोणतीही हानी झालेली नाही. सुरक्षा दलाचे पथक सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळावरून एक एके-47 रायफल आणि इतर शस्त्रे जप्त केली आहेत. याशिवाय दारूगोळा आणि स्फोटकांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

'सकाळी अबुझमाड भागाकडं दल रवाना झालं होतं. तेव्हा तिथं नक्षलवाद्यांशी चकमक झाली. यात 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांच्या मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. एके-47 रायफल आणि शस्त्रे सापडली आहेत. या गेल्या काही दिवसात 88 नक्षलवादी चकमकीत मारले गेले आहेत'.- सुंदरराज पी, बस्तर आयजी

गृहमंत्र्यांनी सुरक्षा दलांचं केलं अभिनंदन : छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी अबुजमाड चकमकीत मिळालेल्या यशाबद्दल सुरक्षा दलांचं अभिनंदन केलं आहे. यासोबतच विजय शर्मा यांनी नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं आहे. त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री विष्णु देव साय यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवायचा आहे. जर कोणताही नक्षलवादी, किंवा मोठा किंवा लहान गट व्हिडिओ कॉलद्वारे किंवा मध्यस्थीद्वारे बोलू इच्छित असेल, तर आम्ही तयार आहोत. त्यांचं पुनर्वसन सरकार करेल. आम्ही त्यांना मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचं आव्हान करतो, आम्हाला बस्तरमध्ये शांतता तसंच विकास हवा आहे' - विजय शर्मा, गृहमंत्री, छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये आतापर्यंत 88 नक्षलवादी ठार : छत्तीसगडमध्ये 2024 मध्ये एकूण 88 नक्षलवादी मारले गेले आहेत. यापूर्वी 16 एप्रिल रोजी कांकेरमध्ये झालेल्या चकमकीत 29 नक्षलवादी ठार झाले होते.

हे वाचलंत का :

  1. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत ९ नक्षलवादी ठार - Bijapur Naxal Encounter
  2. हिदूर जंगलातील चकमकीत नक्षलवादी ठार, बस्तर फायटरच्या जवानाला वीरमरण
  3. MP Naxal Encounter: नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार

Last Updated : Apr 30, 2024, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.