हैदराबाद National Broadcasting Day 2024 : तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलत आहे. मोठ्या आकाराच्या रेडिओ आणि टीव्हवरून प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल आलाय. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांची माहिती काही सेकंदात प्रत्येकापर्यंत पोहचणे सोपं झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण प्रसारक बनू लागलाय. सुरुवातीच्या काळात फक्त रेडिओ हा एकच प्रसारणाचं माध्यम होतं.
आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 1927 मध्ये आकाशवाणीची स्थापना झाली. भारतीय ब्रॅाडकास्टिंग कंपनी या खासगी कंपनीच्या माध्यमातूल बॉम्बे स्टेशनवरून 23 जुलै 1927 रोजी देशातील पहिले रेडिओ प्रसारण झाले. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचे रुपांतर ऑल इंडिया रेडिओमध्ये करण्यात आले. सेंट्रल न्यूज ऑर्गनायझेशन (CNO) ऑगस्ट 1937 मध्ये अस्तित्वात आली. त्याचवर्षी आकाशवाणी दळणवळण विभागाच्या अखत्यारीत आली आणि चार वर्षांनंतर ती माहिती आणि प्रसारण विभागाच्या अंतर्गत आली.
National Broadcasting Day - 2024
— Akashvani आकाशवाणी (@AkashvaniAIR) July 22, 2024
Celebrating India's Public Broadcasting Legacy!
https://t.co/6O7GqZs19b @PIB_India @MIB_India @prasarbharati @airnewsalerts pic.twitter.com/4MlsgwfdRK
- राष्ट्रीय प्रसारण दिनाबद्दल मनोरंजक तथ्ये
- अमिताभ बच्चन यांना नाकारली संधी: बिग-बी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. मात्र, त्यांच्या आवाजामुळेच त्यांना ऑल इंडिया रेडिओमध्ये संधी मिळाली नाही. यावरून असे दिसून येते की यश नेहमीच सहज मिळत नाही. कालांतरानं बिग बीनं आपल्याच आवाजाच्या जादूनं प्रेक्षकांच्या ह्रदयावर अधिराज्य निर्माण केलं.
- हार्मोनियमवर बंदी (1940-1971): 1940 ते 1971 दरम्यान, ऑल इंडिया रेडिओत कार्यक्रमांना संगीत देण्यासाठी हार्मोनियम वापरण्यास बंदी होती. कारण, ते भारतीय वाद्य नसल्यामुळे पारंपारिक संगीत हाताळू शकणार नाही, अशी त्यावेळी धारणा होती.
- ऑल इंडिया रेडिओवर पहिली जाहिरात (1967): 1967 मध्ये, ऑल इंडिया रेडिओनं आपली पहिली जाहिरात प्रदर्शित केली. त्यानंतर प्रसारणाच्या पद्धतीत मोठा बदल झाला.
- दूरदर्शनची सुरुवात (15 सप्टेंबर, 1959): राष्ट्रीय प्रसारण नेटवर्क दूरदर्शन 15 सप्टेंबर 1959 रोजी सुरू झालं. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ या दोन्ही संस्थांनी 1 एप्रिल 1976 पर्यंत एकत्र काम केलं.
भारतातील रेडिओ प्रसारणाचा इतिहास
- बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब अंतर्गत 1923 मध्ये ब्रिटीश काळात भारतात रेडिओ प्रसारण सुरू झाले.
- कालांतरानंतर सरकारनं रेडिओ प्रसारण ताब्यात घेतले. सरकारने त्याचं नाव बदलून 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ आणि 1957 मध्ये आकाशवाणी असं ठेवलं.
- बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास (आताचे चेन्नई) येथे रेडिओ क्लबची स्थापना झाली. त्यानंतर 1923 आणि 1924 मध्ये भारतातील रेडिओ प्रसारण खासगी उपक्रम म्हणून सुरू झाला.
- 1927 मध्ये, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (IBC) या खासगी कंपनीनं भारत सरकारसोबत एक करार केला. त्यानंतर त्यांना दोन रेडिओ स्टेशन्स प्रसारण करण्याचा अधिकार देण्यात आला.
- 1 मार्च 1930 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (IBS) संपुष्टात आली. सरकारनं त्यांना प्रसारण सुविधांची जबाबदारी आपल्या हाती घेतली.
- 1 एप्रिल 1930 रोजी भारतीय राज्य प्रसारण सेवा (ISBS) दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर स्थापन करण्यात आली.
- 8 जून 1936 रोजी भारतीय राज्य प्रसारण सेवा (ISBS) ऑल इंडिया रेडिओ (AIR) अस्तित्वात आली चार महिन्यांनंतर कलकत्ता रेडिओ क्लबही प्रसारित झाला.
- खासगी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेड (IBC) जुलै 1927 मध्ये अस्तित्वात आली. ही कंपनी मुंबई आणि कलकत्ता येथे दोन रेडिओ केंद्रांसह कार्य करू लागली. पण त्याच्या उद्घाटनानंतर अवघ्या तीन वर्षांनी IBC रद्द करण्यात आले. सरकारने त्याचे कामकाज हाती घेतले.
- 8 जून 1936 हा दिवस भारतातील रेडिओ प्रसारणाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भारतीय राज्य प्रसारण सेवेचे ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण करण्यात आलं.
- आकाशवाणी हे जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारकांपैकी एक आहे. आकाशवाणीत अंदाजे 23 भाषा आणि 146 बोलींमध्ये 415 पेक्षा जास्त रेडिओ स्टेशन आहेत. आकाशवाणी लोकसंख्येच्या 99% कव्हर करते. आकाशवाणीकडं 18 FM चॅनेल आहेत.
हेही वाचा
- राष्ट्रीय आंबा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि फायदे - National Mango Day 2024
- डॉक्टर दिनानिमित्त इतिहास, थीम आणि महत्त्व जाणून घ्या... - national doctors day 2024