नवी दिल्ली Narendra Modi Oath Taking Ceremony : काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. यावेळी मोदी आपल्या मंत्र्यांसह शपथ घेतील. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले एकमेव पंतप्रधान आहेत. त्यामुळं हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक मानला जात आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी शेख हसीना दिल्लीत दाखल : मोदींच्या शपथविधी सोहळ्याला श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशसमधील प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शनिवारी (8 जून) दिल्लीत दाखल झाल्या आहेत. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, एनएसजी कमांडो, ड्रोन, स्नायपरसह सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय.
कडक सुरक्षा व्यवस्था : परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्तचर विभागाचे अधिकारीही परदेशी पाहुण्यांसाठी तैनात करण्यात आलेत. जेणेकरून विदेशी पाहुण्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. तसंच परदेशी पाहुणे ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करतील, त्या हॉटेलमधून शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजेच राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. दिल्ली पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, शपथविधी सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती लक्षात घेता, ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोटली पायलट एअरक्राफ्ट, हॉट एअर फुग्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
एनडीएनं जिंकल्या 293 जागा : लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएनं 543 पैकी 293 जागा जिंकत बहुमताचा आकडा पार केला. तर, इंडिया आघाडीनंही एक्झिट पोलचे अंदाज धुडकावून लावत 234 जागा जिंकल्या आहेत. भाजपाचं सर्वाधिक वर्चस्व असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपानं खराब कामगिरी केली आहे. इंडिया आघाडीनं इथं मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागांवर विजय मिळविला.
हेही वाचा -
- नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचं 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण नाही - PM Modi swearing ceremony
- मोदी 3.0 मध्ये राज्यातील कोणत्या खासदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी, वाचा संभाव्य यादी - Cabinate Ministers
- नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था, अनेक परदेशी पाहुणे दिल्लीत दाखल - Narendra Modi swearing ceremony