ETV Bharat / bharat

खंडणीसाठी गोळीबार; मुख्तार अन्सारीचा कुख्यात गुंड जुगनू वालियाला ठोठावली 2 वर्षाची शिक्षा - Court Punished Jugnu Walia

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 13, 2024, 1:19 PM IST

Court Punished Jugnu Walia : कुख्यात माफिया मुख्तार अन्सारीच्या टोळीतील गुंड जुगनू वालिया याला न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा सुनावली. जुगनू वालिया हा पंजाबमधील पटियाला कारागृहात बंद आहे.

Court Punished Jugnu Walia
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

लखनऊ Court Punished Jugnu Walia : कुख्यात मुख्तार अन्सारी टोळीतील गुंड जुगनू वालिया हा पंजाबच्या पटियाला कारागृहात बंद आहे. मात्र मार्च 2011 मध्ये खंडणी न दिल्यानं संतापलेल्या जुगनू वालिया यानं व्यापाऱ्यावर गोळीबार केला. या प्रकरणी त्याला न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. मार्च 2011 मध्ये आलमबागमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयानं जुगनू वालियाला ही शिक्षा सुनावली आहे. उत्तरप्रदेशातील टॉप 65 गुन्हेगारांच्या यादीत जुगनू वालियाचा समावेश आहे. पंजाबच्या तुरुंगात बंद असूनही त्याला परत आणण्यात उत्तरप्रदेशच्या पोलिसांना यश आलेलं नाही.

Mukhtar Ansari Gang Member Jugnu Walia
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

डबल बॅरल बंदुकीनं केला गोळीबार : तक्रारदार अधिकारी अरविंद कुमार अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र सिंग दीपा यांनी लखनऊमधील आलमबाग पोलीस ठाण्यात 9 मार्च 2011 ला तक्रार दाखल केली. देवेंद्र सिंग दीपा हे रात्री 9.30 वाजता घराच्या दरवाजाजवळ उभं राहून शेजाऱ्याशी बोलत होते. त्याचवेळी जुगनू वालिया हा त्यांच्या घरासमोर स्कूटरवर येऊन थांबला. यावेळी त्यानं त्याच्या हातातील डबल बॅरल बंदुकीनं त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर त्यांनी घरात धावत जाऊन आपला जीव वाचवला. मात्र, या गोळीबारात त्यांच्या कारचं नुकसान झालं. या प्रकरणी विशेष न्यायालयानं जुगनू वालियाला दोन वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. खंडणीची मागणी केलेली रक्कम न दिल्यामुळे जुगनू वालिया यानं तोडफोड केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

Mukhtar Ansari Gang Member Jugnu Walia
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

गुरूच्या मार्गावर शिष्याची वाटचाल : कुख्यात गुंड गुजनू वालिया हा मुख्तार अन्सारीला आपला गुरू मानतो. जुगनू वालिया त्याच्या गुरुच्या मार्गावर वाटचाल करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तब्बल दोन वर्षे लखनऊ पोलीस जुगनू वालियाच्या शोधासाठी पंजाबमध्ये गेले, मात्र त्यांना रिकाम्या हातानं परतावं लागलं. जुगनू वालिया याला 6 मे 2023 रोजी पंजाबच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सनं खार इथून अटक केली. तो उत्तरप्रदेश पोलिसांचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार असल्याचं पंजाब पोलिसांनी कबूल केलं. मात्र, त्याला केवळ बेकायदेशीर शस्त्रं बाळगल्याच्या आरोपावरून अटक केली. त्यानंतर त्याची रवानगी पंजाबमधील रूपनगर तुरुंगात करण्यात आली.

Mukhtar Ansari Gang Member Jugnu Walia
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

हेही वाचा :

  1. गँगस्टर मुख्तार अन्सारीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन - Gangster Mukhtar Ansari passed away
  2. Mukhtar Ansari : माफिया मुख्तार अन्सारीला 'या' प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा, वयापेक्षा जास्त गुन्हे आहेत दाखल
  3. स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या आजोबांचा नातू ते कुविख्यात गुंड, मुख्तार अन्सारीची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? - Mukhtar Ansari New

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.