शिवपुरी (मध्य प्रदेश) Teacher In Baniyan : देशाच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. कुठे शाळेची इमारत पडकी असते, तर कुठे शिक्षकाचाच पत्ता नसतो. या दुरावस्थेची प्रचिती नुकतीच मध्य प्रदेशातील एका घटनेनंतर आली. येथील शिवपुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
शिक्षक बनियान घालून शाळेत आला : हा व्हिडिओ पिचोर येथील एका प्राथमिक शाळेचा आहे. शाळेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात एक मद्यधुंद शिक्षक फक्त बनियान घालून शाळेत आलेला दिसतोय! प्रमोद भगौरिया असं या शिक्षकाचं नाव. हा शिक्षक व्हिडिओमध्ये गुंडगिरी करताना स्पष्ट दिसतोय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या शिक्षकाला निलंबित करण्यात आलं.
शिक्षकावर गुन्हा दाखल : ग्रामस्थांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून स्थानिक जिल्हा पंचायत सदस्यांसह विभागीय अधिकाऱ्यांना पाठवला. यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी समरसिंह राठोड यांनी तातडीनं या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीनंतर शिक्षकाचं हे कृत्य अस्वीकार्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी नागरी सेवा कायदा अंतर्गत शिक्षकावर गुन्हा दाखल केला आणि त्याला तत्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आलं.
तत्काळ निलंबित केलं : या प्रकरणी शिवपुरीचे डीईओ समर सिंह राठोड म्हणाले की, "पिचोरच्या इमलिया येथील प्राथमिक शाळेत नियुक्त शिक्षक प्रमोद भगौरिया यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्यांचं वर्तन आक्षेपार्ह असल्याचं आढळून आलं. यानंतर शिक्षकाला तत्काळ अटक करण्यात आली आहे. त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कोणत्याही शाळेत अनुशासनहीनता खपवून घेतली जाणार नाही."
हे वाचलंत का :