ETV Bharat / bharat

अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी मेहुण्याला फाशीची शिक्षा - Minor Sister in Law Murdered - MINOR SISTER IN LAW MURDERED

Minor Rape Murder Case : उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील दिबियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील मेहुणीवर बलत्कार करुन हत्या केल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. या प्रकरणात न्यायालयानं मेहुण्याला फाशीची शिक्षा सुनावणीली आहे.

Minor Rape Murder Case
Minor Rape Murder Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 10:05 PM IST

Updated : Mar 23, 2024, 3:27 PM IST

औरैया Minor Rape Murder Case : गेल्या वर्षी, उत्तर प्रदेशच्या औरैयामध्ये, दाजीनं अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार करत तिचा गळा दाबून खून केला होता. या प्रकरणी न्यायालयानं मेव्हण्याला दोषी ठरवत 9 महिन्यांत फाशीची शिक्षा सुनावली. याशिवाय 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

मेव्हण्याला फाशीची शिक्षा : प्रकरण औरैया जिल्ह्यातील दिबियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. 30 मे 2023 रोजी मेहुण्यानं परिसरातील गावात आपल्या 10 वर्षीय मेहुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या प्रकरणात विशेष न्यायाधीश मनराज सिंह यांनी मेव्हण्याला POCSO कायदा अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

बलात्कार करून खून : या प्रकरणाची सुनावणी 30 जूनपासून सुरू होती. त्यामुळं न्यायालयानं दोषीला 9 महिने 22 दिवसांत शिक्षा सुनावली. DGC अभिषेक मिश्रा, विशेष सरकारी वकील जितेंद्र तोमर आणि मृदुल मिश्रा यांनी फिर्यादीच्या वतीनं बाजू मांडली. फिर्यादीनं दिबियापूर पोलिसात त्याच्या 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याची तक्रार दाखल केली होती. जावयानं तिच्यावर बलत्कार करत हत्या केल्याचा तिच्या कुटुंबाचा आरोप होता.

मेव्हण्याला ठरलं दोषी : तपासानंतर दिबियापूर पोलिसांनी आरोपी आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणी नऊ महिने 22 दिवस चाललेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 18 मार्च 2024 रोजी पोक्सो न्यायालयानं मेव्हण्याला बलात्कारासह गळा दाबून खून केल्याप्रकरणी दोषी ठरवलं.

मुलीच्या वडिलांनी नोंदवली तक्रार : 30 मे 2023 रोजी पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या मोठ्या मुलीचे सासर औरैया जिल्ह्यात होते. काही दिवसांपूर्वी मोठ्या मुलीच्या मुलाचा मृत्यू झाला होता. ती खूप अस्वस्थ होती, म्हणूनच त्यांची धाकटी मुलगी तिच्या घरी गेली होती. यानंतर बुधवारी तिच्या मृत्यूची बातमी पालकांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. तसंच आरोपीला ताब्यात घेऊन कारागृहात पाठवण्यात आलं होतं.

हे वाचलंत का :

  1. दोन अल्पवयीन मुलींवर प्रार्थनास्थळात बलात्कार; चॉकलेटचं आमिष दाखवून केला अत्याचार, आरोपींना अटक
  2. Ujjain Rape Case : उज्जैन बलात्कार प्रकरण; ५ संशयित ऑटो चालक ताब्यात, तपासासाठी 'एसआयटी' स्थापन
  3. Minor Girl Raped In Madarsa : मदरशातील बालिकेवर मौलानाचा अत्याचार; विरोध केल्याने पीडितेला मारहाण, नराधमाविरोधात गुन्हा दाखल

Last Updated : Mar 23, 2024, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.